Vijay Wadettiwar On Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर संतोष देशमुख हत्या (Beed Sarpanch Case) प्रकरणाचा मु्द्दा चांगलाच चर्चेत आला आहे. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपींना अटक केलं. मात्र, अद्यापही या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत. तसेच वाल्मिक कराडवर पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. तसेच वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आला असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप विरोधक करत आहेत.

तसेच वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न मंत्री धनंजय मुंडे हे करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. यावरून धनंजय मुंडेंचा मंत्रि‍पदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. आता या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करत मोठा दावा केला आहे. “बीड जिल्ह्यातील घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मौन पाहता मंत्री धनंजय मुंडेंची विकेट काढली जाऊ शकते आणि त्यांच्याऐवजी छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो”, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Congress Candidates List Nana Patole
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Maharashtra assembly election 2024 Ajit Pawar NCP releases fourth list of 2 candidates
Ajit Pawar NCP 4th Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”

हेही वाचा : धनंजय मुंडेंनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे; कारण..”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मौन पाहता कदाचित मंत्री धनंजय मुंडे यांची विकेट काढली जाऊ शकते. धनंजय मुंडे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता किंवा असा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे का? असा प्रश्न आम्हाला चार ते पाच दिवसांपासून पडलेला आहे. कारण अजित पवार हे बीडच्या प्रकरणात अजिबात बोलत नाहीत. यामध्ये छगन भुजबळ यांना कदाचित ‘वेट अँड वॉच’ची भूमिका ठेवावी लागेल. अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसरा पर्याय असेल. कारण भेटीमध्ये काहीतरी ठरलं असेल”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

“…तर वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो”

विजय वडेट्टीवार यांनी यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने या गुन्ह्यातील सुत्रधारांना वाचवण्यासाठी आरोपीचे इन्काऊंटर केले जाऊ शकते, असा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं की, “मला काल जी माहिती मिळाली ती अशी आहे की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की, मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काऊंटर करू नका. हा बिचारा म्हणणार नाही. पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर होणार असेल तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे. मला काल विश्वसनीय माहिती, जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने दिली. यावरून काहीही होऊ शकतं, अशी शक्यता या प्रकरणामध्ये आहे”, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

Story img Loader