रामगिरी महाराज यांच्या समर्थानार्थ अहमदनगर येथे काढलेल्या मोर्चात बोलताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांना वादग्रस्त विधान केलं होतं. रामगिरी महाराजांविरोधात कुणी बोललं, तर मशिदीत घुसून मारू, असं ते म्हणाले होते. या विधानानंतर आता राजकीय वातावरण तापू लागलं असून विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणेंच्या या विधानावरून सत्ताधाऱ्यावर टीकास्र सोडलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी एक्स या समाज माध्यमावर नितेश राणे यांचा व्हिडीओ पोस्ट करत सत्ताधाऱ्यावर टीका केली आहे. हे दंगलखोर कोण आहे? सरकारने यांच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
mallikarjun kharge yogi adityanath
Video: डोक्यावरून हात फिरवत खर्गेंची योगी आदित्यनाथांवर खोचक टीका; म्हणाले, “ते डोक्यावर केस…”!
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…

हेही वाचा – एक छावणी लुटण्याइतके शिवाजी महाराज छोटे नव्हते, जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

“मुख्यमंत्री म्हणतात की विरोधकांना महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे, मग हे आमदार कोण आहेत? कोणत्या पक्षाचे आहेत? कोणाला घुसून मारण्याची भाषा करत आहेत? राज्याचे गृहविभाग कुठं आहे? गृहमंत्री गप्प का? अद्याप कोणती कारवाई का नाही नाही?”, असे प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत.

पुढे बोलताना, “सरकार नितेश राणे यांच्यावर कारवाई करणार नाही आणि करूही शकत नाही. कारण सत्ताधाऱ्यांना अशा दंगलखोरांना तसेच गुंडांनाबरोबर घेऊन दंगल घडवायची आहे. हे लोक सत्तेसाठी महाराष्ट्र जाळायला निघाले आहेत”, असा आरोपही त्यांनी केला. “तुम्हाला महाराष्ट्राचे भल व्हावं, असे वाटत असेल तर या चिथावणीखोर आमदारावर कारवाई करा”, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा – Eknath Khadse : “…अन्यथा मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच राहणार”, एकनाथ खडसेंचं मोठं विधान

नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?

अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या सभेला संबोधित करताना भाजपाचे आमदार नितीश राणे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. “आमच्या रामगिरी महाराजांविरोधात कोणी काही बोलले तर आम्ही मशिदींमध्ये घुसून त्यांची निवडून निवडून हत्या करू”, असा थेट इशारा त्यांनी दिला होता. तसेच “रामगिरी महाराजांनी सिन्नरमधील प्रवचणात जो मुद्दा मांडला तो सतत मांडत रहावा, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे”, असेही ते म्हणाले होते.