संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली गेली. या एसआयटीतले अधिकारी बीड जिल्ह्यातील आहेत. तसंच आरोपीशीही त्यांची ओळख आहे, मी घनिष्ठ मैत्री असं म्हणणार नाही मात्र आरोपीला ते ओळखतात. त्यामुळे आम्ही ही मागणी करतो आहोत की या अधिकाऱ्यांना बदलण्यात यावं असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करा

वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात अटक झाली आहे. आवादा कंपनीतल्या दलित वॉचमनला खंडणीच्या प्रकरणावरुनच मारहाण करण्यात आली. वॉचमन दलित समाजाचा असल्याने गावातल्या सरपंचाने हस्तक्षेप केला आणि खंडणी मागणाऱ्यांना तिथून जायला सांगितलं. हाच संतोष देशमुख यांचा गुन्हा ठरला. त्याचा बदला म्हणून संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे धागेदोरे हे स्पष्टपणे वाल्मिक कराडपर्यंत जातात. त्यामुळे वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा ही मागणीही आम्ही केली आहे असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

What sharad pawar wrote on that paper chhagan bhujbal says
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी त्या कागदावर काय लिहून दिलं होतं? छगन भुजबळांनी सांगितला पवारांचा ‘तो’ संदेश; म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : “धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा, जर…”; छगन भुजबळ यांचं वक्तव्य काय?
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Chandrashekhar Bawankule Answer to Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे अतिविलासी, मातोश्री २ च्या…”, मोदींवर टीका केल्यानंतर भाजपाचं उत्तर
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

छगन भुजबळ यांची भूमिका मला पटली नाही-वडेट्टीवार

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद पाहिली. त्यांनी म्हटलं आहे की आरोप सिद्ध होईपर्यंत राजीनामा घेऊ नका. माझा इतकाच प्रश्न आहे की छगन भुजबळ यांच्यावरही आरोपच झाले होते. त्यांना तुरुंगात का जावं लागलं? त्यावेळच्या लोकांना शहाणपणा कळला नाही का? विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांच्यास अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची उदाहरणं आहेत. त्यांच्यावरही फक्त आरोपच झाले होते. आता हत्येसारख्या गुन्ह्यात आरोप होत असतील तर राजीनामा दिला पाहिजे. कारण या प्रकरणातले पुरावे दाबले जात आहेत, नष्ट केले जात आहेत त्यामुळेच आम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. छगन भुजबळ यांचं म्हणणं कुणालाही पटणारं नाही. आरोपी हा आरोपी असतो त्याला जात-पात, धर्म काहीही नाही. मात्र आत्ता जे काही स्वरुप दिलं जातं आहे ते ओबीसी विरुद्ध मराठा असं दिलं जातं आहे पण त्यात काही तथ्य नाही. अमानुष खून करणाऱ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. तसंच चौकशीत जे अडथळे आणत आहेत त्यांना सत्तेतून बाजूला केलं पाहिजे हीच आमची मागणी आहे असंही वडेट्टीवार म्हणाले.

आपण मतदारराजाचे सालगडीच असतो-विजय वडेट्टीवार

आम्ही मतांची भीक मागायला जातो तेव्हा आम्ही भिकारी असतो. मतं मागताना आम्ही झुकतो, वाकतो. निवडून दिल्यानंतर जर आमचा इगो हर्ट असत असेल किंवा मतदारांना कमी लेखण्याचा प्रयत्न होत असेल तर ते गैर आहे. लोकशाहीत मतदार हा मालकच आहे, राजाच आहे. पाच वर्षांसाठी आपण त्याचे सालगडीच आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. तसंच संजय गायकवाड हे जे काही बोलले ते त्यांच्या पोटातलं ओठांत आलं. पैसे देऊन मतं विकत घेऊन सत्तेत आले का? या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला आहे. पैसे देऊन मत विकत घेतलं गेलं आहे हे स्पष्ट झालं असंही वडेट्टीवार म्हणाले. अशा लोकांना आमदार पदावर राहण्याचा अधिकार नाही.

Story img Loader