Vijay Wadettiwar On Tekchand Sawarkar : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सध्या अनेक नेत्यांचे सभा, मेळावे आणि बैठका सुरु आहेत. अशातच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ महायुती सरकारने आणली. सध्या या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची मोठी चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाच काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा आणि शिंदे गटाचे नेते महेश शिंदे यांनी मुखमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता.

यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे आमदार टेकचंद सावरकर यांचा लाडकी बहीण योजनेबाबतचा एक व्हिडीओ काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. तसेच पोस्टमध्ये विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. “महायुतीची भानगड समोर आली, मतांचा दुष्काळ संपवण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा जुगाड केला आहे”, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजपाचे आमदार टेकचंद सावरकर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये भाजपा आमदार लाडकी बहीण कमळाला मत देईल, म्हणून हा जुगाड केला असं म्हणत आहेत.

bhosari assembly constituency Election 2024 Latest News
भोसरी विधानसभेतून महाविकास आघाडीकडून अजित गव्हाणे यांचा अर्ज दाखल; लांडगे विरुद्ध गव्हाणे असा सामना होणार
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Anil Deshmukh, Anil Deshmukh news, Anil Deshmukh latest news,
देशमुखांची बदलेली भूमिका गृहकलह की राजकीय खेळी ?
nitin gadkari
Nitin Gadkari : VIDEO : “राजकीय नेत्यांना त्यांच्या मुलांच्या तिकीटाची चिंता, पण आम्हाला…”; नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
devendra fadnavis filled nonamination
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात शक्तीप्रदर्शन; मविआला लक्ष्य करत म्हणाले, “लाडक्या बहिणी विरोधकांना…”
MLA Anna Bansode candidature has been announced from Pimpri Assembly Constituency Pimpri
पिंपरी विधानसभा: उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार अण्णा बनसोडे नाराज गटावर म्हणाले “आमच्यात वाद… “
BJP MLA Rajesh Chaudhary Family Members Created Ruckus in Hospital
VIDEO : भाजपा आमदाराचा भाऊ-पुतण्याची गुंडगिरी, रुग्णालयाची तोडफोड; डॉक्टर व नर्सना लाथाबुक्क्यांनी मारहाण
Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil:
Jayashree Thorat : “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर..”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा

हेही वाचा : Prakash Ambedkar : “अक्षय शिंदेला पोलीस कशाच्या शोधासाठी घेऊन जात होते?”, प्रकाश आंबेडकरांचा सवाल

विजय वडेट्टीवार यांचं ट्वीट काय?

“अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपाच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे”, असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमधून केला आहे. तसेच याच पोस्टमध्ये विजय वडेट्टीवार यांनी भारतीय जनता पक्षाचे कामठी मौदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये टेकचंद सावरकर हे लाडकी बहीण योजनेवर बोलत आहेत.

व्हिडीओमध्ये भाजपा आमदार काय म्हणाले?

“आम्ही एवढी मोठी भानगड कशासाठी केली, तुम्ही इमानदारीने सांगा. ज्या दिवशी तुमच्या घरापुढे मतदानाची पेटी येईल. त्यावेळी या माझ्या लाडक्या बहिणी कमळाला मत देतील, यासाठी आम्ही हे जुगाड केलंय. हे सर्वजण खोटं बोलले असतील. मात्र, मी खरं बोलतो. माझं बोलणं खरं आहे की नाही? नाहीतर बोलायचं एक आणि करायचं एक, मी काय रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे का?”,असं भाजपाचे आमदार टेकचंद सावरकर हे व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.