Vijay Wadettiwar vs Pratap Sarnaik ST Bus Fare Hike: इंधन दरवाढ, बसच्या सुट्या भागांची वाढलेली किंमत, महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीच्या बस प्रवासात १४.९५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. परिवहन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील प्रवाशांकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. दरम्यान, प्रस्तावित भाडेवाढीची मला कोणतीच कल्पना नव्हती, असं आश्चर्यकारक वक्तव्य खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांना न विचारताच भाडेवाढ झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावरून “परिवहन खात्याला वाली नाही का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच ते म्हणाले, “सरकारने एसटीची दरवाढ मागे घ्यावी, या खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंबंधीचे आदेश मागे घ्यावेत किंवा विभागाला तसे आदेश द्यावेत. कारण त्यांनी स्वतः मान्य केलं आहे की हे आदेश त्यांनी दिलेले नाहीत. त्यांना अशा निर्णयाची कल्पना नव्हती”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा