राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेली आठ-नऊ वर्षे अडगळीत पडलेले व पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून दुरावलेले ज्येष्ठ नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने प्रयत्न चालवला आहे.  बदलल्या राजकीय परिस्थितीत मोहिते-पाटील हे भाजपशी जवळीक ठेवून आहेत. त्यांचे वडील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभाच्या समारंभात त्याचे संकेत मिळाल्याचे मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साखर पट्टय़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व संपविण्यासाठी एकीकडे सत्ताधारी भाजपने हाती घेतलेले प्रयत्न हळूहळू यशस्वी होत असताना त्यात मोहिते-पाटील  घराण्यालाही आपल्याकडे ओढून घेण्याचे प्रयत्न त्यादिशेने पडत असल्याचे दिसून येते.

एकेकाळी सोलापूर जिल्ह्य़ासह पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारण व सहकार क्षेत्रात दबदबा असलेले खासदार मोहिते-पाटील यांचे पवार काका-पुतण्यांनी पंख छाटून त्यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यातच आणले आहे. पक्षात ‘बहिष्कृत’ ठरले गेलेले मोहिते-पाटील हे अशा परिस्थितीत राजकीय निर्णय घेतील, अशी अटकळ बांधली जात होती. पण त्यांनी अजूनपर्यंत तरी तसा निर्णय घेतलेला नव्हता. परंतु अलीकडेच भाजप नेत्यांबरोबरच्या ‘संवादा’मुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

मुळात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा शासकीय निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घराण्याबाबत तसेच या गटाला मानणाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. या जन्मशताब्दी वर्षांच्या मुख्य सोहळय़ावरही भाजपचेच प्रभुत्व राहिले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांची तसेच अन्य महत्त्वाच्या नेत्यांची या सोहळय़ास असलेली अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.

भाजप प्रवेशाच्या अफवा-रणजितसिंह मोहिते                                                                                                                                        

तथापि, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह अन्य कोणीही राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या केवळ अफवा आहेत, असा निर्वाळा त्यांचे पुत्र, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी, मोहिते-पाटील व गणेश नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केल्याचे वृत्त प्रसिध्द झाले तरी, दानवे यांनी खासदार मोहिते-पाटील यांच्याशी संपर्कही साधला नाही, असे स्पष्टीकरणही रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिले.