एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात येणारा पर्यावरण गौरव पुरस्कार विकास सहकारी साखर कारखान्यास प्राप्त झाला. या पुरस्कारामुळे सहकारक्षेत्र व साखर उद्योगात हा कारखाना पथदर्शी ठरला आहे.
विकास कारखान्यास आतापर्यंत विविध क्षेत्रातील पारितोषिके प्राप्त झाली. तथापि पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त उद्योगाबाबतचा हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने कारखान्याचा लौकिक वाढला. साखर उद्योग प्रदूषणपूरक मानला जातो. पण विकास कारखान्याने पर्यावरण संवर्धक रचना उभी केली. वृक्षलागवड केली, जलसंधारण व जलव्यवस्थापनाचे प्रयोग केले. जलसंधारणाचे प्रयोग, ठिबक सिंचन योजना, ऊसविकास योजना, पर्यावरणपूरक काम या बाबींचा तुलनात्मक अभ्यास करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड (पुणे) व एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाने हा मानाचा पुरस्कार ‘विकास’ला दिला.
पुरस्कार वितरण सोहळय़ास इस्रायलचे प्रतिनिधी इयान दिऑन, बेल्झियमचे व्हाईस कॉन्सिल पिनकेय अहलुवालिया, अफगाणिस्तानचे जाहीद वालीद, नद्याजोड प्रकल्पाचे अभ्यासक राजेंद्र माहुलकर आदींची उपस्थिती होती. कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक एस. डी. बोखारे, आसवनी प्रमुख एस. एल. थोरात यांनी पुरस्कार स्वीकारला.

Story img Loader