माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी बाभळगाव येथील विलासबाग येथे आयोजित प्रार्थनासभेस कार्यकर्त्यांची अलोट गर्दी जमली होती.
मराठवाडय़ासह राज्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यांनी सकाळीच बाभळगाव गाठले. कार्यकर्त्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन समाधिस्थळी मोठा मंडप टाकण्यात आला होता. डॉ. राम बोरगावकर यांच्या समूहाने भजने म्हटली. रामानुज रांदड यांनी सूत्रसंचालन केले. विलासरावांचे ज्येष्ठ पुत्र आमदार अमित देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, श्रीमती वैशालीताई देशमुख, गौरवी देशमुख व देशमुख कुटुंबीयांनी प्रारंभी समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर आमदार त्र्यंबक भिसे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी आमदार वैजनाथ िशदे, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, उदगीरचे नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी आमदार चंद्रशेखर भोसले, बसवराज पाटील नागराळकर, त्र्यंबकदास झंवर, धनंजय देशमुख, जि.प.च्या अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, भागवत सोट, मोहन माने, जनार्दन वंगवाड, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, परभणीचे सुरेश देशमुख आदींनी दर्शन घेतले. दुपापर्यंत दर्शनासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या.
 

Story img Loader