विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान आणि मतदार वाढल्याची चर्चा सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोळवाडी ग्रामपंचायतीची मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली . आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेर राहणाऱ्या नागरिकांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचे दिसून आले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ज्या ग्रामपंचायतीच्या मुदत संपल्या आहेत किंवा संपणार आहेत. अशा ग्रामपंचायतींची निवडणुकीची प्रक्रिया अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये सुरू झाले आहे. याच अनुषंगाने प्रारूप मतदार याद्या तहसील कार्यालय व ग्राम पंचायत कार्यालय बाहेर लावण्यात आली आहे. व या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती घेण्याचे काम देखील सुरू झाले आहे.
कर्जत तालुक्यातील कोळवडी ग्रामपंचायत मध्ये एका प्रभागांमध्ये तब्बल २०० पेक्षा जास्त बोगस मतदारांची नावे नोंदवण्यात आली आहे. ही अशी नावे आहेत की ते मतदार ग्राम पंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या कार्यक्षेत्रामध्ये राहत नाहीत. असे असताना देखील त्या नागरिकांची नावे मतदार यादी मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून, संतप्त ग्रामस्थांनी थेट तहसील कार्यालय मध्ये येऊन मतदार यादीतील ची नावे रद्द करावी या मागणीसाठी प्रांत अधिकारी, तहसीलदार, निवडणूक अधिकारी, यांची भेट घेऊन त्यांना ग्रामस्थांच्या वतीने सागर नलवडे यांच्या नावाने निवेदन देखील दिले आहे.यावेळी आबा कवडे, सागर नलवडे ,गणेश दवणे, परशुराम राऊत ,आबा थोरात ,महादेव राऊत, चंद्रकांत कवडे ,पांडुरंग दवणे, विठ्ठल दवणे, गणेश सुरवसे, संजय दवणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना , सागर नलावडे व आबा कवडे यांनी सांगितले की, कर्जत नगरपंचायत हद्दीमधील भांडेवाडी येथील प्रभाग क्रमांक 17 मधील व तालुक्यातील अन्य भागातील अनेक बोगस नावे तालुक्यातील कोळवडी ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये नोंदवण्यात आली आहेत. हे सर्व बोगस मतदार जे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राहत नाहीत, असे जवळपास २०० नावे समाविष्ट करण्यात आले आहेत.
ही सर्व बोगस मतदारांची नावे तात्काळ वागळावी अशी आमची मागणी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्येब बोगस मतदारांची नोंदणी केली आहे. यामध्ये काही मतदार ज्यांनी कर्जत नगर पंचायत हद्दी मध्ये घरकुलाचा देखील लाभ घेतलेला आहे. याची सर्व पुरावे आम्ही दिले आहेत. अशा बोगस व येथे न राहणाऱ्या नागरिकांची नावे मतदार यादीत आल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. असे म्हणत ग्रामस्थांच्या वतीने हरकती घेण्यात आल्या असून तसे पत्र तहसीलदार व निवडणूक अधिकारी यांना दिले आहे. यावेळी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी नितीन पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा.