संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यामध्ये एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना घडली. अनेक वर्षांपासून एका गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी आपल्या एका नातेवाईकाकडे आला असल्याची टीप मिळाल्यानंतर पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेले. सावध असलेल्या आरोपीला पोलीस आल्याचा सुगावा लागताच त्याने तिथून धूम ठोकली. पोलीसही त्याच्या पाठोपाठ धावले. रात्रीच्या वेळी आरोपी आणि पोलिसांचा हा पाठ शिवणीचा खेळ चालू असताना अंदाज न आल्याने आरोपी विहिरीत पडला. त्याच्या मागे पळत असलेल्या पोलिसालाही अंदाज न आल्याने तोही विहिरीत पडला. नंतर गावकऱ्यांनी दोघांनाही विहिरीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील तालुक्यातील सांगवी गावामध्ये ही घडली. जुन्या वादाच्या कारणावरून तालुक्यामध्ये २०१६ साली हाणामारी झाल्याची एक घटना घडली होती. या घटनेतील आरोपीने आपल्या मामा आणि मामीला जमिनीच्या वादातून बेदम मारहाण केली होती. त्यामुळे या आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

badlapur encounter case all four accused policemen move bombay high court
बदलापूर चकमक प्रकरण : ठपका ठेवलेल्या चारही पोलिसांची उच्च न्यायालयात धाव, दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत देण्याची, म्हणणे ऐकण्याची मागणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
case filed against man who help to escape accused in kalyan district court
कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपीला पळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इसमावर गुन्हा
shoes of accused in Saif attack case seized Mumbai crime news
पोलिसांच्या हाती आणखी पुरावे; सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचे बूट जप्त
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!
Shantinagar motorcycle thief , Bhiwandi , Tadi ,
ठाणे : ताडी पिण्यासाठी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला, मोक्का आणि जबरी चोरीच्या १८ गुन्ह्यात होता फरारी
Torres Scam Case, High Court, police, Torres Scam,
टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू

हेही वाचा >>> Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी वारंवार प्रयत्न करूनही त्यांना गुणगरा देण्यात आरोपी यशस्वी होत होता. अधूनमधून तो आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी संगमनेरमध्ये यायचा याची माहिती पोलिसांना होती. त्याच्या मोबाईलच्या लोकेशन वरून पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागताच त्याला अटक करण्यासाठी एक पोलीस पथक तातडीने रवाना झाले. आरोपी ज्या ठिकाणी थांबलेला होता, त्या ठिकाणी पोलीस पथकातील कर्मचारी पोहचले. आपल्याला पकडण्यासाठी पोलीस पथक आल्याची कुणकुण लागताच या आरोपीने पोलिसाला धक्का देऊन पलायन केले. पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला.

हेही वाचा >>> Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही? आदिती तटकरे महत्त्वाची माहिती देत म्हणाल्या…

एका शेतातून आरोपी पुढे पळत होता तर पोलीस पथक मागून त्याचा पाठलाग करीत होते. हा सर्व प्रकार रात्रीच्या वेळी सुरू होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीने झाडाझुडपांमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे मध्येच आलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने आरोपी व त्याच्या पाठोपाठ पोलीस पथकातील एक पोलीस कर्मचारी विहिरीत पडले. विहिरीत पडलेल्या आरोपीला पोहता येत असल्याने त्याने लगेचच विहिरीच्या कडेचा आसरा घेतला. मात्र पोलीस कर्मचाऱ्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडू लागला. जीवाच्या आकांताने बुडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांने आरडाओरडा सुरू केला. आवाजाच्या दिशेने धावलेल्या पोलिसांना आरोपी आणि पोलीस कर्मचारी विहिरीत पडल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने काही ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही विहिरीतून वर काढले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विहिरीत पडलेला पोलीस कर्मचारी व आरोपी संगमनेर शहरातील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली.

Story img Loader