नाशिक जिल्ह्यातील अनेक गारपीटग्रस्त गावांमध्ये शासकीय कर्मचारी पंचनाम्यासाठी फिरकले नसल्याच्या तक्रारी असताना नांदगाव तालुक्यातील कासारी येथे मात्र गारपीट झालेली नसताना पंचनामे होऊन अनुदानही मिळाल्याचा आश्चर्यकारक प्रकार त्याच गावातील काही शेतकऱ्यांनी उघडकीस आणला आहे. गारपीट झालीच नसताना गावाला गारपिटीचे अनुदान मिळालेच कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
गारपिटीचा फायदा उठवित शासनाची फसवणूक करण्याचे प्रकार घडून येत आहेत. कासारी येथे गारपीट झालेली नसताना काही ठराविक पुढाऱ्यांच्या मर्जीने तलाठय़ांनी पंचनामा केल्याचे दाखविल्याने १६९ शेतकऱ्यांना गारपीटग्रस्त अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

Story img Loader