Shiv Sangram Chief Vinayak Mete Death : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचं निधन झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये विनायक मेटेंना गंभीर जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर एमजीएम रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले.

नेमका अपघात कसा झाला?

विनायक मेटे यांच्या कारला एका मोठ्या ट्रकने बाजूने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. “आम्ही बीडवरून मुंबईकडे येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. आमचा अपघात ५ वाजता झाला. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”, अशी माहिती विनायक मेटेंचा अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत असणारे सहकारी एकनाथ कदम यांनी ‘एबीपी’शी बोलताना दिली.

st bus accident pune solapur
पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Sanjay Rathod case, death of young woman,
संजय राठोड प्रकरण : तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाचा सवाल
Pune Kalyani Nagar porsche accident case, trial
कल्याणीनगर अपघात प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता
college youth died, bullet hit the divider in pune,
पुणे : बुलेट दुभाजकावर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू, बुलेटच्या धडकेत पादचारी ज्येष्ठासह दोघे जखमी
dumper hit bike, Ratnagiri, Ratnagiri latest news,
रत्नागिरीत डंपरने दुचाकीला उडविले; दोघांचा जागीच मृत्यू
dead body cantonment
पुणे : कटक मंडळाच्या रुग्णालयातील गच्चीवर मृतदेह सापडला
Two youths died in accident on Nagar Solapur highway near Mahijalgaon bypass in Karjat taluka
अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावर माहीजळगाव येथे भीषण अपघातात दोन युवक ठार
Vinayak Mete accident car
अपघातानंतर विनायक मेटेंच्या कारचा असा चुराडा झाला. (फोटो – नरेंद्र वासकर)

मेटेंच्या डोक्याला मागच्या बाजूस गंभीर दुखापत

दरम्यान, एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटेंचा मृत्यू डोक्याच्या मागच्या बाजूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाल्याची शक्यता आहे. “विनायक मेटेंचा अपघात पहाटे ५ च्या सुमारास रसायनीजवळ अपघात झाला. त्यांना फार गंभीर जखमा झाल्या होत्या. बहुतेक त्यांचं घटनास्थळीच निधन झालं होतं. त्यांना ६ वाजून २० मिनिटांनी आमच्या रुग्णालयात आणलं गेलं. इथे आणल्यानंतर त्यांना लगेच तपासण्यात आलं. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्यासोबत गाडीचे चालक आणि बॉडिगार्ड होते. बॉडिगार्डला देखील गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या चालकाची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती सलगोत्रा यांनी दिली.

“त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर जखम झाली होती. अशा वेळी जागेवरच मृत्यू झाला असण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच ही बाब स्पष्ट होऊ शकेल”, असं देखील डॉ. सलगोत्रा यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, विनायक मेटे यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

मराठा समाज नेहमीच सत्तेतला मानला गेला. पण या राज्यात मराठा शेतकरी, शेतमजूर आहेत. त्या समाजाला न्याय देणारा चेहरा म्हणजे विनायक मेटे होते. आता सत्ता पुन्हा आल्यानंतर त्या समाजासाठी काही करण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली होती. त्यांचं असं अचानक जाणं हे या समाजाचं मोठं नुकसान आहे. – विनोद तावडे, भाजपा नेते

राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विनायक मेटे यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना मोठा धक्का बसल्याचं म्हटलं आहे.

विनायक मेटे मराठा आरक्षणासाठी प्रचंड आग्रही होते. त्यांना जिथे संधी मिळेल, तिथे प्रश्न मांडत होते. मराठी आरक्षणासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले होते. या घटनेमुळे हजारो-लाखो कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. – चंद्रकांत पाटील, मंत्री

मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका मांडणारे संभाजीराजे छत्रपती यांनी विनायक मेटेंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

ही अत्यंत दु:खद घटना आहे. विनायक मेटे बेधकडपणे समाजाला न्याय देण्यासाठी आपली भूमिका मांडत होते. त्यांचं निधन हे समाजाचं मोठं नुकसान आहे. हे नुकसान भरून निघणं कठीण आहे. – संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार