भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी राज्याचा आणि उपराजधानीचा विकास केलेला असल्याने नागपूर लोकसभा मतदारसंघात जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील. चांगल्या माणसाच्या नेहमीच मागे राहिले पाहिजे, असे मत व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी गडकरी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. मात्र, यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव न घेता मेटे यांनी त्यांच्यावर टीका केली.  
निर्मल हेल्थ केअर सेंटर आणि अॅम्बुलन्सच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी विनायक मेटे बोलत होते. नितीन गडकरी यांनी राज्यासह उपराजधानीत विकास कामे केली. लोकसभा निवडणुकीत गडकरी यांच्या पाठीशी किती लोक राहतात, हे निवडणुकीत दिसणार असले तरी चांगली विकास कामे करणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी जनतेने उभे राहिले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचेही विनायक मेटे यांनी यावेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा