शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी ठाकरे गटातील खासदार संजय राऊत बोकडाची औलाद आहेत, असं म्हणत जहरी टीका केली. यानंतर आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी आमदार गायकवाडांना एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं. यावेळी राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवरही प्रतिक्रिया दिली. ते मंगळवारी (२२ नोव्हेंबर) बुलढाण्यात बोलत होते.

संजय गायकवाडांनी संजय राऊतांवर केलेल्या टीकेविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर विनायक राऊत म्हणाले, “असल्या घाणेरड्या औलादींना आम्ही जास्त किंमत देत नाही.”

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Sanjay Raut
Sanjay Raut : “महायुतीला जिंकवण्यासाठी पोलीस व गुंडांच्या बैठका”, राऊतांचे आरोप; यादी देण्यास तयार, वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणाले, “सरकार बदलल्यावर…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“कोश्यारींसारखा कुजक्या मेंदुचा माणूस भाजपाची देणगी”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर विनायक राऊत म्हणाले, “भगतसिंह कोश्यारींसारखा कुजक्या मेंदुचा माणूस हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला मिळाला ही भाजपाची देणगी आहे. भगतसिंह कोश्यारींनी सातत्याने सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.”

हेही वाचा : VIDEO: “…तेव्हा ठाकरे गटात उरलेल्या १५ पैकी आठ आमदार शिंदे गटात येतील”, खासदार प्रतापराव जाधवांचा दावा

“भाजपा जाणूनबुजून शिवाजी महाराजांचा अवमान”

“भाजपाचे दुसरे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. भाजपा जाणूनबुजून महाराष्ट्राचं दैवत,हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून आपले खरे दात दाखवत आहेत,” अशीही टीका विनायक राऊतांनी केली.