कोकणातील बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेत ( ठाकरे गट ) आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. बारसू प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणारे हे बंदी घातलेल्या ‘ग्रीनपीस’ संघटनेशी संबंधित असून त्यांना या संघटनेचा पैसा येतो, असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत शुक्रवारी केला होता. याला आता खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

“राज्य सरकारकडून विलंब झाल्याने कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्पात गुंतवणूक करणारी सौदी अरेबियाची ‘अरामको’ ही कंपनी पाकिस्तानात गेली आहे. तरीही केंद्र सरकारच्या मालकीच्या तेल कंपन्यांच्या मदतीने कोकणात बारसू येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प केला जाईल,” अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…

हेही वाचा : रविकांत तुपकरांच्या पाठीमागे भाजपाचा हात? स्वाभिमानी हायजॅक करण्याचा प्रयत्न? राजू शेट्टी ठणकावून म्हणाले…

“…ही माणसे वारंवार बंगळुरूमध्ये जातात”

“सरकारला तेलशुद्धीकरण प्रकल्प गावकऱ्यांना डावलून करायचा नाही. ज्यांना देशाचा विकास नको आहे, असे लोक या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. ही तिच माणसे आहेत की जी ‘आरे’, ‘ बुलेट ट्रेन’, या प्रकल्पांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होती. काही माणसे ‘नर्मदा’ आंदोलनात ही सहभागी होती. ही माणसे वारंवार बंगळुरूमध्ये जातात. त्यांच्या बँक खात्यावर भारतात बंदी घातलेल्या ‘ग्रीनपीस’ या संघटनेकडून पैसे येतात,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

हेही वाचा : महायुती किंवा महाविकास आघाडीत जाणार का? राजू शेट्टी म्हणाले…

“…त्याचा मी धिक्कार करतो”

यावर विनायक राऊत यांनी सडकून टीका केली आहे. “‘अरामको’ कंपनीची दलाली घेतल्यासारखं देवेंद्र फडणवीसांनी व्यक्तव्य केलं आहे. त्याचा मी धिक्कार करतो. हिंमत असेल तर गृहमंत्रीपदाचा वापर करून बारसूमध्ये आंदोलन करणाऱ्या कोणत्या व्यक्तीला बंगळुरूतून पैसे मिळतात, त्याचं नाव जाहीर करा. जर, हिंमत नसेल, तर विधानपरिषदेत वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा राजीनामा द्यावा,” असे आव्हान विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.

Story img Loader