एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन त्यामध्ये शिंदे गटातील अनेक इच्छूक आमदारांना मंत्रीपदं मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अशातच गेल्या महिन्यात अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या एकूण नऊ आमदारांना मंत्रीपदं मिळाली. मात्र, शिंदे गटातील अनेक आमदार अद्याप ताटकळत आहेत. यावरून शिंदे गटावर सातत्याने टीका होत आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना टोला लगावला आहे.

खासदार विनायक राऊत म्हणाले, “शिंदे गटाच्या आमदारांचा आता भ्रमनिरास झाला आहे. मंत्रीपदाची उरली सुरली आशा आता मावळली आहे. रायगडच्या आमदाराला मंत्रीपदाची आशा होती, ती आता मावळली आहे.” विनायक राऊत यांनी नाव न घेता आमदार भरत गोगावले यांना टोला लगावला आहे. आपल्याला मंत्रीपद मिळेल तसेच रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळायला हवं, अशी मागणी भरत गोगावले यांची होती. परंतु, गोगावले यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे खासदार राऊत यांनी आमदार भरत गोगावले यांना टोला लगावला आहे.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar
Ajit Pawar : योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’शी अजित पवार सहमत? म्हणाले, “तडजोडी…”
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”

खासदार विनायक राऊत म्हणाले, शिंदे गटातील आमदारांना मंत्रीपद मिळण्याची आशा मावळली आहे. कारण, अजित पवार गटाचा भस्मासूर शिंदे गटाच्या बोकांडी बसला आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांना आता भविष्य राहिलेलं नाही. त्यांच्यासमोर मोठा राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे. ही त्या सर्वांची एकप्रकारची राजकीय आत्महत्याच आहे.

हे ही वाचा >> शिंदे गटाची सत्ता असलेल्या जिल्ह्यांमध्ये अजित पवारांचं अतिक्रमण? मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “साताऱ्यात…”

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या साताऱ्याच्या खासगी दौऱ्यावर असताना मंत्रिमंडळ विस्तारावर बोलले होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.