एकनाथ शिंदेंनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्याने शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आहे. यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं आहे. त्याचाच फायदा घेत उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला दक्षिण मुंबई जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर मोठी जबाबदारी दिल्याचं समोर येत आहे.
यावरून खासदार विनायक राऊत यांना प्रसारमाध्यमांनी सवाल विचारला होता. ते म्हणाले की, “ज्यांनी त्यांना ही जबाबदारी त्यांचे मी आभार मारतो. नारायण राणे आणि पनवती हे समीकरण मुंबई आणि सिंधुदूर्गमध्ये दिसून आली आहे. त्यामुळे जबाबदारी अशीच चालू ठेवा,” असा टोला राऊत यांनी राणेंना लगावला आहे.
हेही वाचा – “हिंमत असेल तर समोरा समोर या”, राजन विचारेंचे मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान; म्हणाले, “पोलिसांच्या…”
महापालिकेबाबात बोलताना राऊत यांनी म्हटलं, “न्यायालयाच्या दणक्यानंतर पालिकेला शहाणपण मिळालं. प्रशासन सत्ताधाऱ्यांची शहागीर्द म्हणून वावरत असतील, तर योग्य ती जाणीव त्यांना करून देण्याची जबाबदारी मुंबईकरांवर येऊन पडली आहे. प्रत्येक गोष्टीला मुंबई उच्च न्यायालय हाच मार्ग असेल तर, पालिका प्रशासन बरखास्त करा,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा – अंधेरी निवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटलं नाही का?, केसरकरांनी दिला पतंगराव कदमांचा दाखला; म्हणाले…
विनायक राऊतांवर ठाण्यानंतर गडचिरोलीत गुन्हा दाखल झाला आहे. “केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी नंगानाच घातल्याचं चालते. उद्धव ठाकरेंचा ऐकरी उल्लेख, शिवीगाळ करण्यात येते. दादर, हिंगोली आणि संभाजीनगरमध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी हौदोस घातलेला चालतो. शिवसेनेच्या एका नेत्यांनी शिंदे गटावर टिका टिप्पणी केली तर, १५३ च्या नोटीसा बजावल्या जात आहेत. शिंदे गट पोलीस प्रशासनाचा दुरूपयोग करत असून, हे लोकशाहील काळीमा फासणारे आहे,” असेही विनायक राऊतांनी म्हटलं आहे.