महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ६ मे रोजी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते रत्नागिरीत जाहीर सभा घेणार असल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. कोकणातील विविध समस्यांवर ही सभा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात संघटन वाढवण्याकरता मनसेकडून हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> “करोना काळात गुलाबराव पाटलांकडून ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार”; पाचोऱ्यातील सभेपूर्वी संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “ही गुलाबो गॅंग…”

“फार काही किंमत आम्ही देत नाही. येतील आणि जातील. पिकनिकमुळे अनेकवेळा आले आणि अनेकवेळा यावं. आमचं त्याबाबत काही आक्षेप नाही. फार त्याची काही दखल घ्यावी असंही मला वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली. ते टीव्ही ९ मराठीसोबत बोलत होते.

डिसेंबर महिन्यात राज ठाकरेंनी कोकण दौरा केला होता. यावेळी कोकणातील विविध मतदारसंघात जाऊन त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. यानंतर, आता पुन्हा ६ मे रोजी ते रत्नागिरीत जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या दौऱ्याविषयी जाहीर करण्यात आले होते. परंतु, सभा नेमकी कोणत्या मैदानात घ्यायची हे ठरत नव्हते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर ही सभा होणार होती. मात्र, शैक्षणिक संस्था असल्याने ही जागा राजकीय सभेसाठी देणार नसल्याची भूमिका संस्थेने घेतल्याने मनसेने आता कै.प्रमोद महाजन क्रीड संकूल हे ठिकाण निश्चित केले आहे.