Vinod Tawade on Sharad Pawar : देशाचे गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. पण यापैकी कोणालाही आपल्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मंगळवारी हल्ला चढवला. यावर भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी एक्सद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे.

“दोन जन्मठेपांची – काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? श्रद्धेय अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात १७ महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे”, असं विनोद तावडे म्हणाले.

Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
shashank ketkar shares post about delayed payment
आधी निर्मात्यांवर आरोप, आता व्यक्त केली दिलगिरी! शशांक केतकरची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “गैरसमज दूर…”
Devendra Fadnavis vs Sanjay Raut
Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांच्या रक्ताचे डाग धुवून, त्यांना..”; बीड प्रकरणावरुन संजय राऊत यांचा आरोप काय?

“दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीनसारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा पवार विसरले आहेत”, असा पलटवारही विनोद तावडेंनी केला.

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनात अमित शहा यांनी शरद पवार यांचा उल्लेख ‘दगाबाज’ असा केला होता. त्याला पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. ‘सरदार पटेलांनी गृहमंत्री म्हणून काम करताना अनेक राज्यांना एकत्र करण्याचे काम केले. देश एकसंध केला. केंद्रीय गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रातील नेत्यांनी मोठे योगदान दिले आहे. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांनी देशाचे गृहमंत्री म्हणून केलेले काम त्या पदाची प्रतिष्ठा वाढविणारे होते. गुजरात आणि महाराष्ट्र एक राज्य होते. गुजरातने अत्यंत उत्तम प्रशासनाची ओळख देशाला करून दिली. बाबूभाई हे गुजरातचे कर्तबगार, प्रामाणिक आणि स्वच्छ मुख्यमंत्री होते. त्यानंतर माधवसिंह सोलंकी आणि चिमणभाई पटेल आदी नेते उत्तम प्रशासक होते. पण यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आले नव्हते,’ असा टोला पवारांनी लगावला.

Story img Loader