Vinod Tawde : विधानसभा निवडणूक मतदानाच्या एक दिवस आधी विरारमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. एका हॉटेलमध्ये भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली. यासंदर्भातील काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. जवळपास तीन ते चार तास हा संपूर्ण गोंधळ सुरु होता. या संपूर्ण प्रकरणानंतर विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच माध्यमांशी संवाद साधताना विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या सर्व बातम्या खोट्या असल्याचं विनोद तावडेंनी म्हटलं आहे.

विनोद तावडे काय म्हणाले?

“मी चाळीस वर्षांच्या राजकारणात एक दमडी वाटली नाही. मी हितेंद्र ठाकूर यांचं मत विधानपरिषदेत मिळवलं होतं. आता दुपारी मला हितेंद्र ठाकूर यांनी सोडलं. त्यांना काही थोडीफार शंका आली असेल त्यामुळे त्यांनी काही केलं असेल तर निवडणूक आयोगाने चौकशी करावी”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

Vinod Tawde On Rahul Gandhi :
Vinod Tawde : “तुम्ही स्वतः या अन्…”, पैसे वाटपाच्या आरोपावरून राहुल गांधींच्या ट्वीटला विनोद तावडेंचं प्रत्युत्तर
BJP Leader Vinod Tawde Money Distribution Allegations by BVA leader Hitendra Thakur (2)
Video: ‘विवांता हॉटेल’मध्ये नेमकं काय घडलं? विनोद तावडेंवरील…
Maharashtra Exit Poll Result Date Time in Marathi
Maharashtra Exit Poll Result Date Time : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल्स कधी येणार? वेळ काय? तारीख कुठली?
BJP Leader Vinod Tawde Money Distribution Allegations by BVA leader Hitendra Thakur
Vinod Tawde : विवांता हॉटेलमध्ये किती रक्कम सापडली? काय कारवाई झाली? पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुलेंनी दिली ‘ही’ माहिती
Rahul Gandhi On Vinod Tawde
Rahul Gandhi : “विनोद तावडेंना अटक करा”, पैसे वाटप प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींनी मोदींना केला ‘हा’ सवाल
BJP Leader Vinod Tawde Money Distribution Allegations by BVA leader Hitendra Thakur
Vinod Tawde : आरोप-प्रत्यारोपानंतर हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीतून का गेले? ठाकूरांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले, “पोलिसांनी…”
Uddhav Thackeray On Vinod Tawde:
Uddhav Thackeray : “भाजपाचा हा नोट जिहाद, बाटेंगे और जितेंगे…”, विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Anil Deshmukh injured after attack on car in Nagpur
Anil Deshmukh Attack : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अनिल देशमुखांचा सत्ताधाऱ्यांना इशारा; म्हणाले, “मी…”
Shrinivas pawar
Shrinivas Pawar : बारामतीत पैसे वाटल्याच्या आरोपांनंतर श्रीनिवास पवारांच्या शोरूमवर धाड; म्हणाले, “माझा भाऊ अजित…”

हेही वाचा : विवांता हॉटेलमध्ये किती रक्कम सापडली? काय कारवाई झाली? पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुलेंनी दिली ‘ही’ माहिती

हितेंद्र ठाकूर आणि तावडेंवर तीन गुन्हे दाखल

“पैसे वाटपाच्या आरोप प्रकरणानंतर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. एक गुन्हा असा दाखल झाला आहे की, आम्ही दोघांनी (हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे) मिळून पत्रकार परिषद घेतली. दुसरा गुन्हा असा दाखल झाला की मी माझा मतदारसंघ नसताना त्या ठिकाणी गेलो. तिसरा गुन्हा असा दाखल झाला की, हितेंद्र ठाकूर हे मतदारसंघ नसताना त्या ठिकाणी आले. हे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पैशाचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

‘सर्व बातम्या खोट्या’

पैसे वाटप आरोप प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना विनोद तावडे यांनी म्हटलं की, “पैशासंदर्भातील सर्व बातम्या खोट्या आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं की भाजपाच्या नेत्यांनी टीप दिली हे देखील खोटं आहे. आता या आरोपानंतर हितेंद्र ठाकूर गाडीत जाताना काय बोलले ते मला माहिती आहे. त्यामुळे यात काहीही तथ्य नाही”, असंही विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

“मी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटत असतो. त्या अनुषंगाने मी राजन नाईक यांना फोन केला की काय परिस्थिती आहे? तर ते म्हणाले की, सर्व व्यवस्थित सुरु आहे. आम्ही या ठिकाणी बसलो आहोत तर चहाला या. आम्ही त्या ठिकाणी चहा घेण्यासाठी गेलो. एवढं साधं आहे. पण शंका आली आहे ना? तुम्ही पैसे तपासा, सीसीटीव्ही तपासा, काही मिळालं तर कारवाई करा. माझं काहीही म्हणणं नाही”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीच्या बाबतीत मी याआधीच म्हटलं की फक्त राष्ट्र, नो महाराष्ट्र. आता मी आज विरारला जाणार आहे हे पक्षात देखील कोणाला माहिती नव्हतं. त्यामुळे कोणताही विषय नाही. माझी प्रतिमा मलिन होण्याचंही काही कारण नाही, असंही तावडे यांनी म्हटलं.