शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीउसाच्या मालमोटारींची तोडफोड सुरू केली असून पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच, मालमोटारींना पोलीस बंदोबस्त देण्यास सुरूवात केली आहे.  श्रीरामपूर, राहाता, नेवासे, राहुरी, संगमनेर व अकोले तालुक्यात ऊसतोड सुरू आहे. नगर व नाशिक जिल्ह्यांमधील धरणातील पाणी जायकवाडीत सोडण्याची मागणी झाली आहे. त्यामुळे अद्याप शेतीकरिता आवर्तन सोडण्याचा निर्णय झालेला नाही. उसाच्या उभ्या पिकाला पाण्याची गरज आहे. भविष्यातील धोका ओळखून शेतकरी साखर कारखान्यांकडे आमचा ऊस तोडून न्या अशी मागणी करत आहेत.        

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा