बुधवारी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सोलापूर या जिल्ह्य़ात राज यांच्या ताफ्यावरील हल्ल्याचे हिंसक पडसाद उमटले. कोल्हापुरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या  कार्यालयास लक्ष्य करीत प्रचंड नासधूस केली. प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रतिमेचे व मनसेच्या झेंडय़ाचे दहन केले. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात परस्परांविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून आहेत़  
सोलापुरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादीचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला असता त्यात पोलिसांनी हस्तक्षेप केला. यावेळी ४४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
सांगली येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोस्टर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करीत हा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकरणी पोलिसांनी पंधरा जणांना अटक करून नंतर सुटका केली. दोन दिवसांपूर्वी सांगली येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्याला बुधवारी मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले.

Story img Loader