लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तालुक्यातील काळूची ठाकरवाडी येथील बाळू नाथा भले या नराधमाविरुद्घ पारनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भले याने ठेवलेल्या शारीरिक संबंधामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली असून तिला उपचारासाठी नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एक वर्षांपूर्वी आरोपी भले याने पीडित मुलीस मला मूलबाळ नाही, मी तुझ्याशी लग्न करेन असे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. दोघांचे हे संबंध कोणाला सांगितले तर कापून टाकण्याची धमकीही भले याने पीडित मुलीस दिली होती.  
पीडित मुलगी गरोदर राहिल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या आईवडिलांनी भले याच्याकडे विचारणा केली असता त्यांनाही त्याने दमदाटी केली. अखेर पीडित मुलीने पारनेर पोलीस ठाण्यात येऊन स्वत: फिर्याद दिली. पोलिसांनी बाळू भले याच्याविरुद्घ बलात्कार तसेच फौजदारीपात्र धाकदपटशा दाखवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक शरद जांभळे, सहायक निरीक्षक मारुती मुळूक यांनी ठाकरवाडी येथे जाऊन माहिती घेतली. आरोपी भले हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा