नांदेडमधील मुक्रमाबाद येथे शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे खातगावमध्ये एक ६५ वर्षीय वयोवृद्ध नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. विठ्ठल माने असं या व्यक्तीचं नाव असून ते वाहून जातनाची दृष्य कॅमेरामध्ये कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विठ्ठल माने हे नाल्यावरील पुलावर काठीच्या सहाय्याने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत असताना पुलाच्या दोन्ही बाजूला उभी असणारी मंडळी त्यांना मदत करण्याऐवजी व्हिडीओ शूट करत होते. हा व्हिडीओ आता व्हायरल झालाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिळालेल्या माहितीनुसार खतगाव येथे राहणारे विठ्ठल धोडींबा माने हे शेतातील काम संपवून शनिवारी सायंकाळी घरी परतत होते. त्यावेळी ते नाल्यावरील पुलावरुन जात असतानाच अचानक नाल्याला पूर आला. पाण्याचा प्रवाह वाढल्याने विठ्ठल माने हे काठीच्या आधाराने हळूहळू पुढे सरकत होते. मात्र त्यांना पाहण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूने मोठ्याप्रमाणात गावकरी जमले. तरी त्यापैकी कोणीही त्यांना वाचवण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्याऐवजी अनेकजण आपल्या मोबाईलमध्ये समोरची दृष्य टीपण्यासाठी धडपडत करताना दिसले. विशेष म्हणजे यामध्ये अनेक तरुणांचाही समावेश होता. बराच वेळ एक एक पाऊल टाकत पुल ओलांडण्याचा प्रयत्न करत असलेल्या विठ्ठल यांचा काही वेळाने तोल गेला आणि ते प्रवाहबरोबर वाहून गेले.

नक्की पाहा >> Viral Video : …अन् अवघ्या काही क्षणांमध्ये दरीत पडला १८० कोटींचा राष्ट्रीय महामार्ग

रविवारी सकाळी गावाजवळच्या पाझर तलावामध्ये विठ्ठल यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिक तरुणांनी हा मृतदेह बाहेर काढून यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. रविवारी विठ्ठल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुक्रमाबादला पाठवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक कमलाकर गड्डीमे, महसूल विभागाचे तलाठी मारोती श्रीरामे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय.