Vishal Patil on Next Maharashtra CM : सांगलीमध्ये शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सांगलीचे खासदार विशाल पाटील, पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खासदार विशाल पाटील यांनी विश्वजीत कदम यांची ओळख करून देत असताना “आपल्या जिल्ह्याचे माजी मंत्री, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तसेच पाटील म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला भविष्यवाणी करावी लागत नाही. त्यासाठी काही पंचांग वगैरे गोष्टी बघाव्या लागत नाहीत.” विशाल पाटलांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला होता.

दरम्यान, विशाल पाटलांच्या या वक्तव्यानंतर विश्वजीत कदम यांनी देखील भाषण केलं. यावेळी कदम म्हणाले, “बोलण्याच्या ओघात खासदार विशाल पाटील यांनी माझा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. परंतु. याची कोणीही बातमी करू नका. याची बातमी केली तर सगळं जग बाजूला राहील आणि दुसरीच यंत्रणा माझ्या मागे लागेल.” कदमांच्या या वक्तव्यावरही उपस्थितांनी हसून दाद दिली.

decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
L&T , Subramaniam, 90 Hours Work , Work Hours ,
स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी? 
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन

सांगलीच्या राजकारणात सध्या खासादर विशाल पाटील व आमदार विश्वजीत कदम या जोडीची बरीच चर्चा रंगतेय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील उभे राहिले. मात्र या निवडणुकीत विशाल पाटलांनी चंद्रहार पाटलांसह माजी खासदार संजयकाका पाटलांना पराभूत केलं. या निवडणुकीच्या काळात विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी यासाठी विश्वजीत कदमांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर विशाल पाटलांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. या काळातही कदमांनी पाटलांची साथ दिली. आता विधानसभेच्या निवडणुकीत विशाल पाटील विश्वजीत कदमांसाठी मोर्चेबांधणी करत आहेत.

Vishal Patil, Sangli,
सांगलीत विशाल पाटील यांचा सत्कार (image credit- Vishal Patil/fb/file pic)

हे ही वाचा >> विशाळगडावर हिंसाचार झालेल्या भागाची अजित पवारांकडून पाहणी; अतिक्रमणाबाबत म्हणाले…

विशाल पाटलांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण

दरम्यान, महाविकास आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरल्याने काँग्रेसचं वजन वाढलं आहे. हे चित्र मविआच्या जागावाटपातही दिसेल. अशातच विशाल पाटलांनी विश्वजीत कदमांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशाल पाटील हे अपक्ष खासदार असले तरी मागील तीन पिढ्यांपासून त्यांचं कुटुंब काँग्रेसमध्ये आहे. लोकसभेतील विजयानंतर विशाल पाटलांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे काँग्रेसशी संलग्न खासदाराने भावी मुख्यमंत्री म्हणून विश्वजीत कदमांचा उल्लेख केल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Story img Loader