जादूटोणा विधेयकास शिवसेनेचा सक्त विरोध असून आघाडी सरकारने बहुमताच्या जोरावर ते संमत केल्यास युती सरकार सत्तेवर आल्यानंतर ते रद्द करू, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रविवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
अघोरी विद्या, नरबळी, तसेच तारण-मारण यावर शिवसेनेचा विश्वास नसून त्यास विरोध आहेच. श्रद्धा-अंधश्रद्धा यात पुसटसे अंतर आहे. त्याआडून धर्माला धक्का लावला जात असल्यास विरोध असल्याचे श्याम मानव यांच्याजवळ स्पष्ट केले होते. त्यानंतर वारकरी येऊन भेटले. या कायद्याआड अर्थाचा अनर्थ केला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. संकटात मदत करणे ही माणूसकी आहे. मात्र, एखाद्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्याला बाटवणे हाही गुन्हा समजायला हवा. सर्वच धर्माना हा कायदा लागू व्हायला हवा. काही बाबी काढून टाकण्यात आल्या असल्या तरी वारकऱ्यांचा विरोध असल्याने या विधेयकास शिवसेनेचाही विरोध आहे.
कायद्याची गरज आहे की, जनजागृतीची, असा सवाल करून ठाकरे म्हणाले, कायद्याचा दुरुपयोग होता कामा नये. नरबळी वगैरे विद्यमान कायद्यानुसार गुन्हा असून शिक्षाही होते. त्यामुळे नव्या कायद्याची गरजच नाही. आघाडी सरकारने बहुमताच्या जोरावर हा कायदा केल्यास सत्तेवर आल्यानंतर युती सरकार तो रद्द करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा