महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे(बोर्ड) अकरावी आणि बारावीच्या पुस्तकांचे संपादन केले जाते. राज्यात सहा माध्यमांमधून शिक्षण घेण्याची सुविधा असतानाही ऐच्छिक विषयांची पुस्तके मात्र फक्त मराठी आणि इंग्रजी माध्यमातूनच उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अकरावी आणि बारावीच्या पुस्तकांचे संपादनही बोर्डामार्फत केले जाते. विद्यार्थ्यांना नेमकी माहिती देणारे एकच पुस्तक मिळावे या उद्देशाने २००९-२०१० पासून अकरावी आणि बारावीच्या ऐच्छिक विषयांची पुस्तके बोर्डाकडून संपादित करण्यात येऊ लागली. त्याप्रमाणे अकरावी आणि बारावीच्या अठरा विषयांची पुस्तके राज्यमंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, ही पुस्तके फक्त मराठी,इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीच आहेत. बारावीची परीक्षा शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी या माध्यमांमधून, वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांना या चार माध्यमांबरोबरच गुजराती आणि कन्नड माध्यमातून देण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरीही बोर्डातर्फे संपादित केली जाणारी पुस्तके मात्र फक्त दोनच माध्यमांसाठी उपलब्ध आहेत. बोर्डाचे अध्यक्ष जाधव म्हणाले, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या पुस्तकांच्या मागणीचा आम्ही विचार करत आहोत.

Story img Loader