लोकसत्ता वार्ताहर

कराड : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर तब्बल ३० हजार चौरस फुटावर विविध विद्यालयांच्या दोन हजार विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून महाराष्ट्राचा नकाशा साकारून मतदान जागृती करण्यात आली.

education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

मतदान जनजागृती व्हावी, त्यातून मतदानाचा टक्का वाढावा व सर्वांनी मतदान करावे, या उद्दिष्टाने कराड उत्तर व कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून हा भव्य उपक्रम राबवण्यात आला. तहसीलदार स्मिता पवार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, मलकापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, कराड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे, नायब तहसीलदार युवराज पाटील आदी मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती.

आणखी वाचा-Aditya Thackeray : मतदानाआधी ध्रुव राठीचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं आव्हान, आदित्य ठाकरे तयार; म्हणाले, “हे पण…”

दहा शाळांमधील विद्यार्थी

कराड शहरातील दहा शाळांमधील दोन हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर ३० हजार चौरस फुटावर महाराष्ट्राचा नकाशा साकारून मानवी साखळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. केवळ दोनच तासात महाराष्ट्राचा नकाशा साकारून कला शिक्षकांनी आपल्या कलेचे बहारदार प्रदर्शन केले.

आणखी वाचा-MNS : शिवाजी पार्कातील मनसेची १७ तारखेची सभा रद्द, कारण देत राज ठाकरे म्हणाले….

अनेकांचे योगदान

या उपक्रमासाठी अनेकांनी योगदान दिले. त्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र भोसले, सुनील परीट यांनी केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्विप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे, प्रतिभा लोंढे सहायक नोडल अधिकारी सुनील परीट, महेंद्र भोसले, तसेच पथकातील कर्मचारी आनंदराव जानुगडे, ऋषिकेश पोटे, संतोष डांगे, गोविंद पवार, अनिल काटकर यांच्यासह कला शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Story img Loader