शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळासाठी उद्या सोमवारी कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यातील ३३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. विद्यापीठ विकास आघाडी, सुटा आणि शिवशाहू आघाडी यांच्यामध्ये हा सामना रंगला आहे.
हेही वाचा- जलजीवन मिशन योजनेत जादा दराच्या निविदा भ्रष्टाचारच्या हेतूने – चंद्रकांत पाटील
या निवडणुकांसाठी रविवारी १७० केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचा ताफा निवडणूक साधनसामग्रीसह रवाना झाला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत २५ वाहने ठिकठिकाणी रवाना झाली.
हेही वाचा- “…त्यांना बकबक करावी लागते” मुख्यमंत्र्यांसमोरच आव्हाडांची श्रीकांत शिंदे यांच्याशी शाब्दिक चकमक
अधिकार मंडळावर वर्चस्व मिळवण्यासाठी विद्यापीठ विकास आघाडी, सुटा आणि शिवशाहू आघाडीने कंबर कसली आहे. विद्यापीठ विकास आघाडीने प्राचार्य व संस्थाचालक गटातील १६ पैकी १३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. आघाडीचेच वर्चस्व होईल, असे आघाडी प्रमुख डॉ. संजय डी. पाटील, सचिव डॉ. व्ही. एम. पाटील यांनी म्हटले आहे. तर निवडणुकीत प्रथमच उतरणाऱ्या ठाकरे सेना, डाव्या पक्षांच्या शिवशाहू आघाडीचा कितपत प्रभाव राहणार याचाही या निमित्ताने फैसला होणार आहे