सांगली : दिग्गज नेते प्रचारासाठी उतरल्याने चुरशीची ठरलेल्या सांगली, इस्लामपूर बाजार समितीसाठी सकाळी मतदान सुरू झाले. पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासह एक खासदार, चार आमदार, तीन माजी आमदार यांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. सांगली समितीसाठी २४ तर, इस्लामपूरसाठी १८ मतदान केंद्रे असून दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित पॅनेलमध्ये लढत होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली बाजार समितीचे कार्यक्षेत्र मिरज, कवठेमहांकाळ आणि जत हे तीन तालुके असले तरी सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. संचालक मंडळाच्या १८ जागासाठी ९० उमेदवार रिंगणात असून ग्रामपंचायत, विकास सोसायटी या गटातून  १५ संचालक निवडले जाणार असून व्यापारी गटातून दोन तर हमाल व तोलाईदार गटातून एक संचालक असे १८ संचालक निवडून दिले जाणार आहेत.

हेही वाचा – “शिवसेनेची स्थापना कधी झाली हे ज्याला माहित नाही..” ‘तो’ व्हिडीओ दाखवत संजय राऊतांवर नितेश राणेंची टीका

या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत वसंतदादा शेतकरी पॅनेल विरुद्ध भाजपा प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनेल अशी दुरुंगी लढत होत असली तरी बळीराजा पॅनेलच्यावतीने सात उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे. वसंतदादा पॅनेलचे नेतृत्व माजी मंत्री जयंत पाटील, डॉ. विश्‍वजित कदम, आ. विक्रम सावंत, विशाल पाटील माजी राज्यमंत्री अजित घोरपडे हे करीत असून भाजपा प्रणित पॅनेलचे नेतृत्व पालकमंत्री सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील, विलासराव जगताप, राष्ट्रवादीच्या नेत्या महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्याकडे आहे.

हेही वाचा – ठाकरे गटाचे १०० जागांवर विशेष लक्ष

इस्लामपूरमध्ये आ. जयंत पाटील यांचे सर्व विरोधक भाजपा, शिवसेना शिंदे गट, कॉंग्रेस एकत्र आले असून माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राहूल महाडिक, विक्रम पाटील यांच्याकडे विरोधी पॅनेलचे नेतृत्व आहे. विटा बाजार समितीच्या १७ जागांसाठी दोन केंद्रावर मतदान सुरू आहे. या ठिकाणी भाजपा, शिवसेना शिंदे गट व कॉंग्रेस यांचे संयुक्त पॅनेलचा राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलशी सामना होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting started in the morning for sangli islampur bazar committee election ssb
Show comments