वाडा तालुक्यात सोमवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला असून यात युतीने स्पष्ट बहुमत मिळवून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा सपशेल धुव्वा उडवला आहे. युतीने १७ जागांपैकी १२ जागांवर विजय मिळवला आहे. उर्वरित जागांवर बहुजन विकास आघाडीचे तीन तर एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला केवळ एक जागा जिंकता आली आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती. परंतु आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने त्यांना दारुण पराभवास सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष गणारे वाडा शहरात राहत असूनही प्रचारासाठी बाहेर पडले नाहीत. त्यांनी आपल्या प्रभागात मतदानाचा हक्कही बजावला नाही. तसेच राष्ट्रवादीचे नेते योगेश पाटील यांच्या प्रभागातही राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. विद्यमान सरपंच, उप-सरपंच यांच्या प्रभागातही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. वाडा पंचायत समितीचे उपसभापती आणि राष्ट्रवादीचे मंगेश पाटील यांच्या विभागातही श्रीकांत भोईर यांचा विजय झाला. चांबळे येथे मनसेने बाजी मारली.        

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wada village panchyat election yuti in lead