विद्रोही चळवळीच्या अध्यक्षपदी नंदूरबारचे कवी वाहरू सोनावणे यांची निवड झाली. सचिवपदी गौतम कांबळे, तर कार्याध्यक्षपदी धनाजी गुरव यांची निवड करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष विजय मांडके यांनी दिली.
पुणे येथे झालेल्या अधिवेशनात कार्यकारिणीच्या निवडी झाल्या. त्यात उपाध्यक्षपदी विजय मांडके, डॉ.बाबुराव गुरव, प्रसेनजित गायकवाड, जािलदर घिगे, गौतम काटकर, प्रा. सीमा मुसळे यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी प्रा. विश्वास सायनाकर, दीपक कोठावळे यांची तर प्रवक्तेपदी अविनाश कदम, संघटक म्हणून दिलीप पाटील, किरण मोहिते, प्रशांत नागावकर, डॉ माधुरी चौगुले, अनुप्रिया कदम यांची नेमणूक करण्यात आली.
सदस्य पदावर शफिक देशाई, राजकुमार तांगडे, प्रा. संजय साठे, युवराज जाधव, राजुल गंगावणे, पूजा दळे, विजय कांबळे, शिवराम ठवरे, नितीन पवार, शिवराम सुखी यांच्या नेमणुका करण्यात आल्या. बाबा आढाव यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. शरद पाटील यांच्या दास्य आणि जाती अंताच्या लढय़ाची सध्दांतिक मांडणी विचारात घेऊन राज्यात वर्षभरात चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मांडके यांनी सांगितले.
विद्रोही चळवळीच्या अध्यक्षपदी वाहरू सोनावणे
विद्रोही चळवळीच्या अध्यक्षपदी नंदूरबारचे कवी वाहरू सोनावणे यांची निवड झाली. सचिवपदी गौतम कांबळे, तर कार्याध्यक्षपदी धनाजी गुरव यांची निवड करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष विजय मांडके यांनी दिली.
First published on: 05-06-2014 at 02:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waharu sonawane elected for chairman of the rebel movement