वाईच्या दुय्यम निबंधकांना मंगळवारी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ए. ए. मुल्ला असे या दुय्यम निबंधकांचे नाव आहे. पुणे आणि सातारा या दोन्ही ठिकाणच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. मुल्ला हे हस्तकामार्फत लाच घेत होते, असे कारवाई केलेल्या अधिकाऱयांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.