करोनावर जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्या भागातील करोनाबाधीत रुग्णांची काळजी घेणे आवश्यक आहे. या रुग्णांना द्यावी लागणारी इंजेक्शन्स महागडी असल्याने  सर्वसामान्यांना ती घेणे परवडत नाहीत. यासाठी वाई खंडाळा मतदारसंघात ‘५०० इंजेक्शन बँक’ तयार करणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले आहे.

आमदार मकरंद पाटील म्हणाले की,  “गरजू रुग्णांसाठी इंजेक्शन्स मोफत उपलब्ध करून देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. त्यानुसार वाई मतदारसंघात पाचशे इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाबळेश्वर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे एका उद्योगपतींने ४१ इंजेक्शन्स दिली आहेत. वाई शहरातील व तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी साधेपणाने उत्सव करण्याचा निर्णय घेतला असून, ही मंडळेही ५० इंजेक्शन उपलब्ध करून देत आहेत. त्याचप्रमाणे वाई जैन समाजाने २५ इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत.” तसेच, वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघातील अनेक घटक पुढे आले असून, ते या कामात योगदान देत आहेत.त्यांच्या दातृत्वाचा आदर्श घेत इतरांनीही याकामी पुढाकार घ्यावा असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!

करोनाच्या पार्श्वभूमीवर रेमेडीसिव्हीर इंजेक्शनची मदत करावी, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केल्यानुसार महाबळेश्वर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी नुकतीच ही इंजेक्शन आमदार पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी महाबळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाडकर, उपाध्यक्ष रोहित ढेबे, संजय जंगम, संदीप मोरे, अनिकेत रिंगे, दिपक ओसवाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हे इंजेक्शन महागडे असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ते घेणे परवडत नाहीत. त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी सातारा जिल्ह्यासाठी १२५ इंजेक्शन पाठवली असल्याचे सांगत,  वाईतील रुग्णांसाठी अशी इंजेक्शन मिळाली पाहिजेत अशी भूमिका घेऊन आमदार मकरंद पाटील विविध बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन करत आहेत.

वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघात दररोज ५० ते १०० करोनाबाधीत रुग्ण आढळून येत आहेत. मतदार संघातील नागरिकांचा पुणे,मुंबई सोलापूरशी संपर्क होत आहे .करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमेडीसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असतो.सध्या वातावरणातील बदल आणि चाचण्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.यासाठी मतदारसंघात पाचशे इंजेक्शन्स बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

यासाठी अनेक दाते पुढे येत आहेत. वाईतील सार्वजनिक गणेश मंडळांनी तर गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय घेत करोना औषध बॅंक हा अभिनव उपक्रम राबविला आहे. कार्यकर्त्यांनीही करोनासाठी मदतीचा हात दिला आहे. त्यातून ५०० इंजेक्शनची बँक करत आहे. आयत्या वेळी गरजूंना याची मदत होणार आहे. असेही आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले आहे.