मराठवाडय़ात पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आíथक संकटात सापडला आहे. हातून पिके गेल्याने नराश्यापोटी शेतकरी आत्महत्या करीत आहे. आतापर्यंत ६० च्यावर शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. पुन्हा शेतकरी आत्महत्या होण्याची वाट पाहता का, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी केला. शासनाने तत्काळ मराठवाडा दुष्काग्रस्त जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
औंढा नागनाथ तालुक्यातील पारडी सावळी, अनखळी, वाडी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची या पथकाने भेट घेतली. शिवसेनेच्या वतीने रोख ५० हजारांची मदत करण्यात आली. शासनाकडून दिले जाणारे ३० हजारांचे अनुदानाचे धनादेशही त्यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी आ. गजानन घुगे, आ. विजय शिवतारे, अजय चौधरी, राहुल पाटील, अर्जुन खोतकर, सदा सरवणकर, सुनील िशदे, डॉ. जयप्रकाश मुंदडा उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘शिवसेनेच्या वतीने सध्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आíथक मदत देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आमदारांचे हे पथक मराठवाडय़ात फिरणार आहे.’ राज्यात सरकार स्थापनेपूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याआधी लातूरच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी स्वत: दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता ते मुख्यमंत्री झाले असल्याने त्यांच्या विशेष अधिकाराचा वापर करून मराठवाडय़ात दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी असल्याचेही शिंदे म्हणाले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हाच प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी आत्महत्या करण्याची वाट पाहता का?
मराठवाडय़ात पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आíथक संकटात सापडला आहे. हातून पिके गेल्याने नराश्यापोटी शेतकरी आत्महत्या करीत आहे. आतापर्यंत ६० च्यावर शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले.
First published on: 17-11-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wait farmer suicide eknath shinde