घराची भिंत कोसळल्याने तीन वर्षांच्या बालकासह वडिलांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास शहरात घडली. देवपूरमधील विटाभट्टी परिसरात दुर्गा मातेच्या मंदिराजवळच वाणी कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. पहाटेच्या सुमारास घराची भिंत अचानक कोसळली. या वेळी रवींद्र हिरालाल वाणी (३०) आणि त्यांचा मुलगा साहिल हे झोपलेले असतानाच ढिगाऱ्याखाली सापडल्याने अडकले. भिंत कोसळल्याचा आवाज आल्याने परिसरातील रहिवाशांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मातीचा ढिगारा उपसण्यात आल्यावर वाणी पिता-पुत्रास नवल गवळी यांनी जिल्हा रुग्णालयात नेले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले.
धुळ्यात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
घराची भिंत कोसळल्याने तीन वर्षांच्या बालकासह वडिलांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास शहरात घडली. देवपूरमधील विटाभट्टी परिसरात दुर्गा मातेच्या मंदिराजवळच वाणी कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. पहाटेच्या सुमारास घराची भिंत अचानक कोसळली.
First published on: 06-07-2013 at 03:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wall collaps two died in dhule