नाशिकमधल्या उंटवाडी भागात असलेल्या दक्षिणमुखी मारूती मंदिराजवळची एक भिंत एका झोपडीवरची कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. जखमी झालेल्या इसमावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशीही माहिती मिळते आहे. नाशिकमधल्या उंटवाडी रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीला लागूनच एक झोपडपट्टी आहे. भिंतीजवळ बांधकाम सुरु होते, दुपारच्या वेळी काम सुरु असताना अचानकच ही भिंत कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनस्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ३ जणांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. प्रकाश सरकटे असे या व्यक्तीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा