Walmik Karad Audio Clip : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह खंडणी व इतर अनेक गुन्ह्यांप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड व एका महिला पोलीस अधिकाऱ्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये “किरकोळ गुन्हा आहे. आपला पोरगा आहे. जाऊद्या द्या, त्याला सोडून द्या” असं वाल्मिक कराड महिला पोलीस अधिकाऱ्याला सांगत आहे. तसेच वाल्मिक आरोपीशी देखील बोलतो. वाल्मिक आरोपीला सांगतो की “बीड जिल्ह्याचा बाप आहे इथे, काळजी करायचं काम नाही”. तसेच महिला अधिकारी देखील थोडा वेळ लागेल असं सांगत असल्याचं ऐकायला मिळत आहे. ही वाल्मिक कराड व सायबर सेलमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्यामधील संभाषणाची व्हायरल ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, लोकसत्ता या क्लिपची पुष्टी करत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाल्मिक कराड व पोलीस अधिकाऱ्यामधील संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप (Walmik Karad Audio Clip) आहे. यामध्ये कराड सायबर सेलच्या पोलीस उपनिरीक्षकाला सांगतोय की “आमच्या पोराला सोडून द्या”, तसेच तो संबंधित तरुणाला सांगतोय की “बीडचा बाप इथे असताना काळजी कसली करतोस”.

वाल्मिक व पोलीस अधिकाऱ्यामधील संभाषण

वाल्मिक : ताई, वाल्मिक बोलतोय, ती सगळी पोरं जे काही करतायत… चिल्लर पोरं आहेत ती, ते काय येणार आहेत तिकडे. पोस्टी डिलीट केलीय, आता झालं की…

पोलीस : पोस्ट डिलीट केली की माझं झालं ना अण्णा, दुसरं काय पाहिजे?

वाल्मिक (संबंधित तरुणाला) : भय्या पोस्ट डिलीट करून टाका.

पोलीस : अशा पोस्टमुळे वातावरण खराब होतं. म्हणून सर्वांना फोन करतोय.

वाल्मिक : ताई सरुवात त्यांनी केली. अरे ला का रे असणारच!

पोलीस : एक दोन दिवस लागतील. बाकीच्यांना फोन वगैरे जाईल.

वाल्मिक : चालतंय ताई!

वाल्मिक (संबंधित तरुणाला) : इग्नोर करायचं भय्या, अरे भय्या मनावर घ्यायचं नाही. इथं बीडचा बाप बसलाय. कशाला घाबरतोस.

(लोकसत्ता या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही)