Walmik Karad gets 14-day police custody : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या प्रकरणात नाव चर्चेत आलेले वाल्मिक कराड यांनी काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. यानंतर रात्री उशिरा वाल्मिक कराड यांना बीडच्या केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुणावणीनंतर वाल्मिक कराड यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये त्यांनी स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात असून जर पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत.

pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Pushpa 2 Stampede Case
Pushpa 2 Stampede Case : ‘पुष्पा २’ चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या बाउन्सरला अटक; चाहत्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
Kalyan Crime News in Marathi
Kalyan Crime : कल्याणमध्ये परप्रांतीयांची पुन्हा मुजोरी; चिमुरडीच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण
Akhilesh Shukla
कल्याणमधील मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लासह इतर आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी
fake baba satara loksatta news
सातारा : मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; माणमध्ये भोंदूबाबाला अटक
Akhilesh Shukla police
कल्याणमधील मारहाणप्रकरणी शुक्ला यांच्यासह दोन जण ताब्यात, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे उपायुक्तांचे संकेत

व्हिडीओमध्ये काय म्हटलंय?

या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मी वाल्मिक कराड. माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामीनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यात जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी मी तयार आहे.”

हेही वाचा >> Walmik Karad Arrest: संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड पोलिसांना शरण; स्वतः व्हिडीओ प्रसिद्ध करत म्हणाले, “राजकीय द्वेषापोटी..”

पोलीस महानिरिक्षक सारंग आवाड यांनी सांगितले की, कराडला बीड येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडे सोपवण्यात आले असून त्यांच्याकडून खून आणि खंडणी प्रकरणाचा तपास केला जात आहे.

बीड जिल्ह्याती केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांनी पवनचक्की कंपनीकडे पैशांची मागणी करणाऱ्या काही जणांना खंडणीखोरांना त्यांनी विरोध केला होता असे सांगितले जाते.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात चार जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यात फारार होते.

Story img Loader