Walmik Karad Son Sushil Ex Manager Accuses him for Looted House : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. सीआयडीचं तपास पथक सध्या त्याची चौकशी करत आहे. वाल्मिक कराडवर खूनाच्या प्रयत्नासह खंडणी, मारहाणीचेही अनेक खटले चालू आहेत. दरम्यान, आता त्याच्या मुलावरही आरोप होत आहेत. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने त्याच्या जुन्या मॅनेजरला धमकावून मारहाण केल्यायाचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. पीडित कुटुंबाचे वकील विनोद सूर्यवंशी यांनी सांगितलं की “सुशील कराडने माझ्या आशिलाच्या घरात घुसून पैसे व सोन्याची लूट केली. तसेच दोन ट्रक, दोन गाड्या, एक भूखंड बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने माझ्या आशिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा