राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबईतील हुतात्मा चौकात केंद्र आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. मुंबईच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने नीती आयोगावर सोपवली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादीने आंदोलन केलं. या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसाठी अनेक नेते उपस्थित होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

केंद्र सरकारने मुंबईच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी नीती आयोगावर सोपवली आहे. हे राज्यातील मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. केंद्र सरकार जे सांगते, त्या पावलावर पाऊल इथलं सरकार टाकत आहे. नीती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार पंतप्रधान कार्यालयामार्फत मुंबईचा कारभार चालवणार का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. आंदोलनादरम्यान, त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
NCP Sharad Chandra Pawar party has been consistently claiming that it has suffered losses due to the confusion between the Tutari and Pipani symbols in the Lok Sabha elections.
Supriya Sule: “भाजपाकडून रडीचा डाव, अजित पवारांनीही दिली कबुली”, तुतारी-पिपाणीवरुन सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024
लक्षवेधी लढत : प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
cm eknath shinde latest news
“आपलं ठरलयं…महायुतीच्या उमेदवारांचे काम करा”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

हेही वाचा- मनातील मुख्यमंत्री कोण? अजित पवार, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी घेतलं एकाच नेत्याचं नाव, म्हणाले…

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकारने नीती आयोगामार्फत मुंबईचा विकास हाती घेतला, तर मुंबई महापालिका आणि मुंबईतल्या आमदार खासदारांना काहीही अर्थ राहणार नाही. म्हणजे एकप्रकारे पंतप्रधान कार्यालयकडून मुंबईचा कारभार चालवला जाणार का? असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण होतो. मुळात राज्य सरकारसमोर नीती आयागाने मुंबईच्या विकासाबाबत जे सादरीकरण केले, ते एका खासगी कंपनीने तयार करून दिले होते.

हेही वाचा- भाजपाबरोबर जाण्याआधी अजित पवारांनी ऑफर दिली? रोहित पवारांचं थेट भाष्य, म्हणाले…

आता मला असं कळलं आहे की, या खासगी कंपनीने ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या एमएमआरडीएकडूनच मिळवली आहे. म्हणजेच महाराष्ट्र सरकारकडूनच माहिती मिळवून ती पुन्हा महाराष्ट्र सरकारपुढेच सादर करण्यात आली. सरकारमधील कोणत्याच नेत्याला हे कसे कळले नाही? तसेच नीती आयोग जो काही विकासाचा आराखडा राबवणार त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी यावेळी विचारला.