‘‘टाळमृदगांच्या गजरात, माउलींच्या जयघोषात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचे नाम घेत’’ पंढरीच्या ओढीने निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा रविवारी ऐतिहासीक फलटण नगरीत विसावला. आज पालखी सोहळयाचा फलटण येथे मुक्काम आहे.
चांदोबाचा लींब ’येथील वारी सोहळयातील पहीले उभे रींगण आणि तरडगाव येथील मुक्काम संपवून वारकरी पहाटेपासूनच फलटणच्या वाटेला लागले होते. तरडगाव येथील प्रस्थानानंतर पालखी मार्गावरील गावोगावचे स्वागत स्विकारुण श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा लाखो विठठल भक्तांसोबत संध्याकाळी फलटण शहरात दाखल झाला.
आज माऊलींचा रथ विविध रंगांच्या फुलांनी आकर्षक सजविण्यात आला होता. त्यामुळे पालखी रथ सर्वाचे लक्ष वेधून घेत होता.महानुभाव आणि जैन धर्मियांच्या दक्षिण काशीत फलटण शहराच्या प्रवेश व्दाराजवळ प्रांताधिकारी राजेद्र जाधव तहसीलदार विवेक जाधव,नगराध्यक्षा सारीका जाधव,उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे,मुख्याधिकारी यशवंत डांगे व नागरिकांच्यावतीने स्वागत करण्यात आले. माऊलींचा पालखी सोहळा शहरातील मलठण, सदगुरु हरीबुवा मंदीर, पाचबत्ती चौक माग्रे ऐतिहासीक श्रीराम मंदीराजवळ आला.
पुढे पालखी सोहळा गजानन चौक ,महात्मा फुले चौक गिरवी नाका माग्रे विमान तळावर मुक्कामासाठी विसावला.यानतंर वारकरी भाविक आजूबाजूच्या गावातून आलेले ग्रामस्थ फलटणचे नागरीक यांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली नंतर फलटणकरांनी पादुकांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
गोड तुझे रुप गोड तुझे नामो
देई मज प्रेम सर्वकाळो
विठा माऊली हाच वर देईो
संचोरुणी राही हदयामाजीो
तुका म्हणे काही न मागे आणिको
तुझे पायी सुख सर्व आहे.ाो
या ज्ञानोबा माऊलीं तुकाराम..तुकाराम ..तुकारामाच्या सह विठठल नामाच्या जयघोषात आज पालखी सोहळा फलटणनगरीत विसावला आहे. त्यासाठी फलटण पालिकेच्या वतीने विमानतळावरील पालखीतळावर वीज, पिण्याचे पाणी, मोबाइल, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पंचायत समितीच्या वतीने आरोग्य पथक, पुरेसा औषधसाठा,पाणी शुद्धीकरण यंत्रणा, मोबाइल आरोग्य पथक, रुग्णवाहिका, पुरेसा धान्य, रॉकेल व गॅस सिंलिंडरचा साठा तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आजचा मुक्काम संपवून पालखी सोहळा सोमवारी सातारा जिल्हय़ातील शेवटच्या मुक्कामी बरड येथे पोहचणार आहे. त्यानंतर पालखी सोहळा शेवटच्या टप्प्यात सोलापूर जिल्हय़ात प्रवेशणार आहे. फलटण येथून निघाल्यावर सकाळी विडणी येथे पालखी सोहळा न्याहारी घेणार आहे, तर पिंप्रद येथे दुपारचे जेवण आणि सायंकाळी बरड मुक्कामी माउली पोहोचणार आहेत. तेथेही सातारा जिल्हय़ाच्या वतीने पालखी सोहळय़ाच्या सुविधेवर आज शेवटचा हात फिरवण्यात आला.
वैष्णवांचा मेळा फलटणनगरीत
‘‘टाळमृदगांच्या गजरात, माउलींच्या जयघोषात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचे नाम घेत’’ पंढरीच्या ओढीने निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा रविवारी ऐतिहासीक फलटण नगरीत विसावला.
First published on: 20-07-2015 at 05:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wari in faltan