कराड : तुमच्यात जे मस्तीचे रक्त आहे तेच आमच्यातही असल्याने आम्हाला डिवचू नका, संघर्षाच्या वाटेवर नेऊ नका असा मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना इशारा देताना, पोलीस बळ वापरून आपले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. आता पुन्हा आगीशी खेळू नका, तुमच्या छाताडावर बसून मराठा समाजाला आरक्षण घेऊच असा राज्यकर्त्यांना खणखणीत इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फलटण व दहिवडी येथे मराठा आरक्षणसंदर्भात जाहीर सभांमध्ये हजारोंच्या जनसमुदायासमोर ते बोलत होते. जरांगे-पाटील म्हणाले की, आमच्या माय-बापाने काबाडकष्ट करून, आपली पोरं अधिकारी, नोकरदार होण्यासाठी शिकवायची. त्यासाठी पैसे कमी पडल्यास ते सावकाराकडून घ्यायचे. पण, केवळ आरक्षण नसल्यामुळे आमच्या या स्वप्नांची राखरांगोळी झाली. माय-बापाच्या डोक्यावर भरमसाठ कर्ज होताना, मुलं सुशिक्षित बेकार, बेघरही झालीत. पिढ्याच्या-पिढ्या बरबाद झाल्या आणि हे केवळ आरक्षण नसल्याने झाल्यामुळे आम्ही आमचा आरक्षणाचा हक्क मागणे चुकीचे नसल्याचे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

आणखी वाचा-“कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही”, राणेंच्या विधानावर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “आजोबा- पंजोबा…”

आता मराठा आरक्षणप्रश्नी प्रचंड मोठी लाट उठल्याने या आरक्षणाच्या निर्णयाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु असून, मंत्रालयात आणि राज्यकर्त्यांमध्ये केवळ याच विषयाची प्राधान्याने चर्चा सुरु आहे. सर्वसामान्य मराठा बांधवांनी हे आंदोलन हातात घेतल्याने आता आम्ही केवळ आरक्षण मागत नाहीतर ते घेतल्याशिवाय या सरकारला सोडत नाही. त्यांनी नुसती वळवळ आम्हाला सांगायची नाही असाही इशारा जरांगे-पाटील यांनी या वेळी दिला.

गायकवाड आयोगाने मराठा समाजाला मागास सिध्द करून, आरक्षण देण्याची आवश्यकता व्यक्त केली असतानाही आमच्यावर जाणूनबुजून हा अन्याय झाल्याची सल जरांगे-पाटलांनी बोलून दाखवली. मराठा आरक्षणासाठी शासनाने ३० दिवसांचा वेळ मागितला. पण आपण ४० दिवस दिले. उद्या २२ ऑक्टोबरला या आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, आता मराठा आरक्षणाचे हे पहिले आणि शेवटचे आंदोलन यशस्वी करून दाखवूयाच असे आवाहन त्यांनी केले.