लोकसत्ता वार्ताहर

पंढरपूर : राज्यातील धनगर समाजाला घटनेनुसार एसटी आरक्षण असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करा. या पूर्वी सत्तेमधील असलेले आणि नसलेल्या राजकर्त्यांनी आरक्षण देतो म्हणाले पण दिले नाही. त्यामुळे आरक्षणप्रश्नी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा येणाऱ्या विधानसभेला सत्तेच्या खुर्चीवरून पाय उतार करणार असा निर्वाणीचा इशारा धनगर समाजाने दिला आहे. येथे पाच जणांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान या वेळी मनोज जरांगे यांच्यावर टीका करण्यात आली. जरांगे हे जातीजातीत भांडण लावण्याचे काम करीत असून त्यांच्या सर्व बैठका रात्रीच्या अंधारात का होतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
sagar meghe and Sameer meghe
सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?

धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी समस्त समाजाच्या वतीने येथील टिळक स्मारक मैदानात सोमवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. मागील ७० वर्षा पासून धनगर समाज सनदशीर मार्गाने आरक्षण अंमलबजावणीची मागणी करत आहे. परंतु प्रत्येक सरकारने आश्वासनापलीकडे काही दिले नाही. म्हणून धनगर जमातीमध्ये असंतोष पसरलेला आहे. विद्यमान राज्य सरकारने आता तरी तत्काळ आरक्षण अंमलबजावणीचा अध्यादेश काढावा अन्यथा त्यांना सत्तेतून खाली खेचू, असा इशारा पांडुरंग मरगळ यांनी दिला आहे. तर आरक्षण प्रश्नावर वारंवार चालढकल होत असून या प्रश्नावर तातडीने तोडगा न काढल्यास सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचे उपोषणकर्ते माउली हळणवर यांनी इशारा दिला.

आणखी वाचा-पुणे-हुबळी वंदेभारत एक्स्प्रेसला मंजुरी

धनगर समाजाच्या पाच जणांनी प्रातिनिधी स्वरूपात उपोषण सुरू केले आहे. यामध्ये जालन्याचे दीपक बोराडे, पुणे येथील योगेश धरम, सातारा येथील गणेश केसकर, पंढरपूरचे माउली हळणवर आणि विजय तमनर राहुरी यांचा समावेश आहे. या उपोषण आंदोलनात मुंबई, पुणे, नागपूर, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, अकोला, अहिल्यानगरसह राज्यातील सर्व जिल्ह्यांतून धनगर बांधव उपस्थित होते.

दरम्यान, धनगर समाजाचे नेते नवनाथ वाघमोडे यांनी यावेळी मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. जरांगे पाटील हे जातीजातीत भांडण लावण्याचे काम करीत असून त्यांच्या सर्व बैठका रात्रीच्या अंधारात का होतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. धनगर आरक्षणाला जरांगे पाटील यांच्या पाठिंब्याची गरज नसून आम्ही यासाठी सक्षम आहोत, अशी टीका वाघमोडे यांनी केली.