राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीने कारवाई केली. गुरुवारी सकाळी ७ पासून ही कारवाई सुरु होती. स्टेट बँकेकडून घेण्यात आलेल्या थकीत कर्जाज्या संदर्भात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. जवळपास १० गाड्या जळगावात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर माजी खासदार आणि राजमल लखीचंद ज्वेलर्सचे ईश्वरलाल जैन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हटलं आहे ईश्वरलाल जैन यांनी?

जळगावातले राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. त्यानंतर ईश्वरलाल जैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआयकडून या प्रकरणात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर ईडीकडून कारवाई करण्यात आली. मात्र त्या फिर्यादीत काहीही अर्थ नाही असं ईश्वरलाल जैन यांनी म्हटलं आहे. तसंच सगळं काही व्यवस्थित होईल त्यासाठी थोडा वेळ लागेल असंही जैन म्हणाले. राजकीय आकसातून ही कारवाई करण्यात आली का? असं विचारलं असता त्यावर जैन म्हणाले की ही कारवाई राजकीय उद्देशाने झाली आहे असं वाटत नाही. ही कारवाई सीबीआयच्या तक्रारीनुसार झाली. मला बाकी काही चिंता नाही असंही जैन यांनी म्हटलं आहे.

Yograj Singh Shares Incident of His Father Said My Father Killed a Tiger Smeared its blood on my lips and Forehead
Yograj Singh: “माझ्या वडिलांनी वाघाची शिकार करून रक्त माझ्या ओठाला लावलं…”, युवीच्या बाबांनी सांगितला धक्कादायक किस्सा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
gulabrao patil controversial statements marathi news
गुलाबरावांची वादग्रस्त विधानांची पाटीलकी
Loksatta editorial on pm Narendra modi dig at China in Brunei over supports development not expansionism
अग्रलेख: ‘या’ विस्ताराचे काय?
manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
Jitendra Awhad on Devendra Fadnavis,
एक छावणी लुटण्याइतके शिवाजी महाराज छोटे नव्हते, जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर
What Indrjit Sawant Said About Devendra Fadnavis?
Indrajit Sawant : “छत्रपती शिवरायांनी दोनदा सूरत लुटलं, राजकारणासाठी इतिहास…”, इंद्रजित सावंत यांची फडणवीसांवर टीका
Devendra Fadnavis Trolled For His Statement
Devendra Fadnavis : “छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलं नाही, काँग्रेसने…”, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरुन ट्रोलिंग, कोण काय म्हणालं?

ईडी पथकाच्या १० गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण सहा फर्मवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी केली. ईडीकडून सर्व ठिकाणाच्या फर्मवर असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरु केली असल्याची माहिती समोर आली.

कारवाईमध्ये ईडीचे एकूण ६० कर्मचारी आणि अधिकारी सहभागी असल्याची माहिती दिली आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत पहिल्यांदाच ईडीचे पथक दाखल झाल्यानं सुवर्ण नगरीसह संपूर्ण जळगाव शहरात या कारवाईची चर्चा सुरु झाली आहे. स्टेट बँकेकडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्ज विषयक ही कारवाई असल्याचं सांगितलं जातं आहे. मागील वर्षीसुद्धा सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी केली होती.