मराठवाडयातील जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. यामुळे नाशिकमधील गोदावरी नदीत पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गाडया वाहून गेल्याचे वृत्त आहे. यंदा मराठवाडयात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा नाहीय. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप धोपणानुसार नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाडयातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले आहे. दारणा, गंगापूर, निळवंडे, मुळा, मुकणे धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे.

निळवंडे धरणातून ६००० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. गंगापूर धरणातून २ ११२, निळवंडे धरणातून ४२५०, मुळा धरणातून ६ हजार तर मुकणे धरणातून १ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water from nashik dam to marathwada jaykwadi dam cars drown
Show comments