कवि ग्रेस यांच्या कविता दुबरेध आहेत असे सांगितले जाते मात्र सहज, सोपे काय आहे ? आणि ही दुबरेधता समजावून घेण्याचा प्रयत्न हे आपल्या ओंजळीत आलेल्या पाण्याप्रमाणे आहे. जे मिळाले त्याचा आनंद घ्यायचा, समजले नाही ते समजावून घ्यायचे हा सततचा प्रवास म्हणजे ग्रेस समजावून घेणे आहे, असे प्रतिपादन कवी श्रीनिवास वारुंजीकर यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प श्रीनिवास वारुंजीकर आणि मानसी कानेटकर यांनी गुंफले. ग्रेसच्या कवितांचा रसास्वाद या विषयावर कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम नगर वाचनालयाच्या पाठक सभागृहात झाला त्यावेळी ते बोलत होते.
मसाप सातारा शाखेचे अध्यक्ष मधुसूदन पतकी यांनी ग्रेस यांच्या ६६ व्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर पी.बी.गुरव यांच्या हस्ते वारुंजीकर आणि कानेटकर यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रेस यांची कविता दुबरेध का या प्रश्नावर अनेक वेळा चर्चा झाली आहे. ग्रेस यांनाही याबाबत प्रश्न विचारला गेला होता, मात्र कविता आहे तशी आहे असे त्यांचे उत्तर असायचे. आपले अनुभवाचे अवकाश, चिंतन, मनन यावर कवितेच्या समजण्याची अनुभूती येते असे वारुंजीकर म्हणाले. ग्रेस यांच्या कविता समजणे, त्यातला गíभतार्थ समजणे किंवा सत्य समजणे हे सत्याकडे जाणारे मार्ग आहेत मात्र कवितेच्या अर्थाचे अंतिम सत्य असत नाही. त्यामुळे बहुपेडी, अनेक अर्थ निघणारी अशी त्यांची कविता आहे. त्यांच्या कवितांची गंगा वाहत रहाते आपण आपल्याला जमेल तेवढे अर्थ घ्यायचे एवढेच आपल्याला जमणारे आहे असे वारुंजीकरांनी सांगितले. यावेळी वारुंजीकर यांनी ग्रेस यांच्या आठवणी सांगून कवितांचे वाचन केले. कानेटकर यांनी कवितांचे गायन करून कार्यक्रमाला रंगत आणली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा