८६ वनतळे, १५८४ दगडी नालाबांध व १० सिमेंट बंधारे
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनच्या जंगलात पावणे चार कोटींचा निधी खर्च करून ८६ वनतळे, १ हजार ५८४ दगडी नालाबांध व १० सिमेंट बंधारे बांधण्यात आल्याने विक्रमी ५ लाख १० हजार घनमीटर पाण्याची साठवणूक होणार आहे. असा पाणी साठवणुकीचा प्रयोग राज्यातील या एकमेव व्याघ्र प्रकल्पात होत असल्याने भविष्यात ताडोबा बफरमधील वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार असून शंभरावर गावातील पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
ताडोबाच्या बफर झोनमध्ये एकूण ७९ गावांचा समावेश आहे, तर याच बफर झोनच्या गावाला लागून शेकडो गावे आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात या व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांच्या पिण्याचा प्रश्न ऐरणीवर असतो. त्यामुळे वन्यजीव-मानव संषर्घाचा प्रश्नही उद्भवतो, परंतु ताडोबातील वन्यप्राण्यांची तहान या प्रकल्पात अंधारी नदीसह भागविणारे अनेक छोटे मोठे नालेही आहेत. यात उपाशानाला, जामून झोरा, तेलिया धरण आहे, तर छोटे मोठे मिळून सात-आठ तलाव या प्रकल्पात आहेत. यात ताडोबा, कोळसा, जामणी, पांगडी, कारवा, पिपरहेटी, बोटझरी, पिपरी, तेलिया, महालगाव, मोहर्ली, जामून झोरा, शिवणझरी, फुलझरी, आंभोरा हे महत्वाचे तलाव, तर कोसेकणार, आंबट हिरा, काटेझरी, काळा आंबा, चिखलवाही, सांबर डोह, कासरबोडी, जांबून झोरा, आंबेडोह बंधारा, चिचघाट, आंबेगड, गिरघाट, वसंत बंधारा हे वॉटर होल आहे. नदीनाले, तलाव व वॉटर होल वन्यप्राण्यांची तहान भागविते. मात्र, गेल्या तीन वर्षांंपासून ताडोबा व्यवस्थापनाच्या वतीने पाण्याचे योग्य नियोजन केले जात असल्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत नाही. परिणामत: वन्यजीव-मानव संघर्षही कमी झालेला आहे.
या सारे लक्षात घेऊन ताडोबा व्यवस्थापनाने यंदाही ताडोबात वनतळे, दगडी नाला बांधकाम व सिमेंट बंधाऱ्याची कामे मोठय़ा प्रमाणात हाती घेतली आहेत. ताडोबा बफर झोनमध्ये यंदा विक्रमी ८६ वनतळे खोदण्यात आलेली आहेत. बहुतांश वनतळ्यातील गाळ काढून खोलीकरण, तर जेथे वनतळे पूर्णत: बुजलेले आहे तेथे नवीन तळे खोदण्यात आले आहे. वनतळे खोलीकरणावर तब्बल २ कोटी ५५ लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे. सोबतच १ हजार ५८४ दगडी नाला बंधारे बांधण्यात आलेली आहेत, यामुळे ताडोबातील नदीनाले व झऱ्यांचे पाणी थांबण्यास मदत होणार आहे. या कामावर १ कोटी २१ लाखांचा खर्च केला गेला, तर १० सिमेंट बंधारे पूर्ण करण्यात आल्यामुळे ताडोबात विक्रमी ५ लाख १० हजार घनमीटर पाण्याची साठवणूक होणार आहे. त्यामुळे बफर झोनमधील ७९ आणि सीमावर्ती भागातील शंभरावर गावातील विहिरी, हातपंपाची पाण्याची पातळी वाढणार आहे. याचा सर्वाधिक फायदा या गावातील शेतकऱ्यांना होणार आहे. परिणामत: या शेतकऱ्यांना दुबार पिके घेणेही शक्य होणार आहे. नवेगाव चौकीजवळ नवीन शेततळे करण्यात आलेले आहे. त्याचा लाभ भविष्यात मोठय़ा प्रमाणावर होईल. इतक्या मोठय़ा प्रमाणात पाणी साठवणुकीची क्षमता असलेला ताडोबा हा राज्यातील एकमेव प्रकल्प ठरला आहे. वनतळे व दगडी नाल्यांमुळे या प्रकल्पाला पाणीटंचाईची समस्या भेडसावणार नाही, अशी माहिती ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी दिली.