शहरातील एका जलवाहिनीची गळती बंद करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याने शनिवारी सायंकाळी व रविवार सकाळी असे दोन दिवस गंगापूर रोड व कॉलेज रोडचा काही परिसर, गणेशनगर, कामगारनगर आदी भागात पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
सध्या शहरात पाणीकपात लागू असून बहुतांश भागात एक वेळ पाणीपुरवठा केला जातो. त्यात काही भागात सकाळी व काही भागात सायंकाळी पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी शनिवार-रविवारी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. यामुळे बळवंतनगर, गणेशनगर, रामराज्य, नहूष, सोमेश्वर कॉलनी, सिरीन मेडोज्, रामकृष्णनगर, नवश्या गणपती परिसर, सद्गुरूनगर, काळेनगर, निर्मल कॉलनी, आनंदवल्ली, शारदानगर, सावरकरनगर, भोसला मिलिटरी स्कूल, नवरचना, मते नर्सरी, डिसुझा कॉलनी, कृषीनगर, बीवायके कॉलेज, अयोध्या कॉलनी, दातेनगर, आकाशवाणी टॉवर परिसर, गीतांजली सोसायटी, सहदेवनगर, चिंतामणी मंगल कार्यालय परिसर, दादोजी कोंडदेवनगर, सुयोजित संकुल या भागात शनिवारी सकाळी सहा ते नऊ या दरम्यान पाणीपुरवठा करण्यात येईल. शनिवारी सायंकाळी व रविवारी सकाळी या भागात पाणीपुरवठा होणार नाही. रविवारी सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असेही या विभागाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा