शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टोलेबाजी केली आहे. आम्ही पवारांना नेहमी घाबरून असतो. त्यांच्यासारखी बुद्धी कुणाचीही चालत नाही, असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे. ते जळगाव येथे एका विवाह सोहळ्यात बोलत होते. या लग्नातील नवरी मुलगी पवार कुटुंबातील होती. त्यावरून गुलाबराव पाटलांनी शाब्दिक टोलेबाजी केली.

लग्नाच्या कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “नवरी मुलगी पवार कुटुंबातून येते. त्यामुळे आम्ही पवारांना घाबरुनच आहोत. तुम्ही सकाळी-सकाळी शपथ घेऊन टाकता आणि काहीही करून टाकता. आम्हाला काही कळू देत नाही. आम्ही पवारांना नेहमी घाबरुन असतो. त्यामुळे पवारांना कायम बरोबर ठेवावं लागतं. कारण पवारांची जी बुद्धी चालते, तेवढी कुणाचीच चालत नाही.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

हेही वाचा- देवेंद्र फडणवीसांची निधीवरून अजित पवारांसमोर जोरदार टोलेबाजी; आठवलेंच्या कवितेचा आधार घेत म्हणाले…

“राजकारणाचा आणि विरोधाचा भाग सोडा पण हा लग्न सोहळा आहे. हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही. व्यक्तीच्या घरातला कार्यक्रम आहे. माणुसकीतला हा सोहळा आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप आशीर्वाद देतो,” असं मनोगत गुलाबराव पाटलांनी यावेळी व्यक्त केलं. गुलाबराव पाटलांच्या या टोलेबाजीचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

Story img Loader